Ajinkya Rahane Memes: No Dhoni,No Runs.. सलग दुसऱ्या सामन्यात फ्लॉप ठरलेल्या अजिंक्यची नेटकऱ्यांनी घेतली शाळा; भन्नाट मिम्स VIRAL

IND vs WI 2nd Test: या फ्लॉप कामगिरीनंतर त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
ajinkya rahane
ajinkya rahane saam tv
Published On

Viral Memes On Ajinkya Rahane: भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना त्रिनिदादमध्ये सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत ४ गडी बाद २८८ केल्या आहेत.

भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. दरम्यान भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्याचे पाहायला मिळाले आहे.

तो अवघ्या १० धावा करत माघारी परतला आहे. या फ्लॉप कामगिरीनंतर त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

ajinkya rahane
IND vs WI 2nd Test: जयस्वालची 'यशस्वी' घोडदौड सुरूच! दुसऱ्याच इनिंगमध्ये तोडला गब्बरचा 'हा' मोठा रेकॉर्ड

सलग दुसऱ्या कसोटीत फ्लॉप...

या सामन्यातही अजिंक्य रहाणे फ्लॉप ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. तो ३६ चेंडूंचा सामना करून अवघ्या ८ धावा करत माघारी परतला आहे. पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरल्यानंतर तो दुसऱ्या सामन्यातून कमबॅक करेल असं वाटलं होतं. मात्र या सामन्यातही त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्याच्यावर धावा करण्याचा दबाव असल्याचं दिसून आलं.

अजिंक्य रहाणेला २०२२ मध्ये संघाबाहेर केलं गेलं होतं. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएल २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीची दखल घेत त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं.

इतकेच नव्हे तर त्याला उपकर्णधारपद देखील दिलं गेलं आहे. मात्र सलग २ सामन्यात फ्लॉप ठरल्यानंतर त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (Latest sports updates)

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया...

भारतीय संघ मजबूत स्तिथीत

पहिला कसोटी सामना जिंकणारा भारतीय संघ दुसऱ्या कसोटीतही मजबूत स्थितीत आहे. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला आहे. डावाची सुरुवात करताना कर्णधार रोहित शर्माने ८७ तर यशस्वी जयस्वालने ५७ धावांची खेळी केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १३९ धावा जोडल्या.

तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी कारण्यासाठी आलेला शुबमन गिल या डावातही फ्लॉप ठरला. तो अवघ्या १० धावा करत माघारी परतला. तर अजिंक्य रहाणेला अवघ्या ८ धावा करता आल्या. विराट कोहली नाबाद ८७ धावांवर फलंदाजी करतोय. तर रविंद्र जडेजा ३६ धावांवर नाबाद आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ४ गडी बाद २८८ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com