Rinku Singh Bat: उधारीच्या बॅटने केली कमाल! रिंकू सिंहच्या खणखणीत पाच सिक्सची Inside Story

Nitish Rana Bat: रिंकू सिंगच्या बॅटबद्दल एक विशेष माहिती समोर आली आहे.
Rinku Singh
Rinku SinghTwitter
Published On

Rinku Singh IPL 2023: रविवारी आयपीएल स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात चमत्कारिक सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामान्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला अंतिम षटकात विजयासाठी २९ धावांची गरज होती. त्यावेळी रिंकू सिंहने तुफान फटकेबाजी करत सलग ५ षटकार मारले आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला. आता रिंकू सिंहच्या बॅटबद्दल एक विशेष माहिती समोर आली आहे.

Rinku Singh
Rinku Singh IPL 2023: उमेश यादवच्या 4 शब्दांचा इम्पॅक्ट अन् रिंकूने ठोकले खणखणीत 5 षटकार! काय म्हणाला उमेश यादव? वाचा

रिंकू सिंहने शेवटच्या षटकात ५ षटकार मारून कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला. मात्र ती बॅट रिंकू सिंहची नव्हतीच. मग ती बॅट कोणाची होती? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर ही बॅट होती कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार, नितीश राणाची. स्वतः नितीश राणाने याबाबत खुलासा केला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नितीश राणाला ही बॅट कोणालाच द्यायची नव्हती. मात्र कोणीतरी बॅट बाहेर आणली आणि ती बॅट घेऊन रिंकू सिंह मैदानात उतरला. हीच बॅट घेऊन नितीश राणा गेल्या ४-५ सामन्यांमध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. तसेच सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत देखील तो हीच बॅट घेऊन खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्स संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाकडून विजय शंकरने २४ चेंडूंमध्ये ६३ धावांची खेळी केली.

तर साई सुदर्शनने ५३ धावा कुटल्या. या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने २० षटक अखेर ४ गडी बाद २०४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून वेंकटेश अय्यरने सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली.

तर रिंकू सिंहने शेवटी फलंदाजीला येऊन नाबाद ४८ धावांची खेळी केली आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com