वेस्टइंडीजचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरन सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. या फलंदाजाने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर गोलंदाजीची डोकेदुखी वाढवली आहे. सध्या वेस्टइंडीजमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत तो ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय.
या संघाकडून खेळताना त्याने बारबाडोस रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १५ चेंडूत २७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने यावर्षी टी-२० क्रिकेटमध्ये २०५९ धावा पूर्ण केल्या आहेत. या रेकॉर्डमध्ये त्याने मोहम्मह रिझवानला मागे सोडलं आहे.
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने २०२१ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये एकूण २०३६ धावा केल्या होत्या. आता निकोलस पूरनने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. त्याने जगभरातील टी-२० लीग स्पर्धांमध्ये धावांचा पाऊस पाडत हा रेकॉर्ड मोडला आहे. त्याला या धावांमध्ये आणखी भर घालण्याची संधी असणार आहे.
मोहम्मद रिझवानबद्दल बोलायचं झालं, तर ज्यावेळी २०३६ धावा केल्या होत्या. त्यावेळी १ शतक आणि १८ अर्धशतकं झळकावली होती. मात्र निकोलस पूरनबद्दल बोलायचं झालं, तर त्याने यादरम्यान एकही शतक झळकावलेलं नाही. त्याने १४ अर्धशतकं झळकावली आहेत. २०२४ मध्ये फलंदाजी करताना त्याचं रौद्ररुप पाहायला मिळालं आहे. टी-२० क्रिकेटमध्ये एकाच वर्षात फलंदाजी करताना १००० धावांचा पल्ला गाठण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने तिसऱ्यांदा हा कारनामा केला आहे. यापूर्वी २०१९ आणि २०२३ मध्येही त्याने १००० धावा पूर्ण केल्या होत्या.
त्याने यावर्षी टी-२० क्रिकेट खेळताना लखनऊ सुपर जायंट्स, डर्बन सुपर जायंट्स, एमआय न्यूयॉर्क, एमआय एमिरेट्स, नॉर्दर्न सुपर चार्जर्स, रंगपूर रायडर्स आणि वेस्टइंडीज संघाचं प्रतिनित्व करताना धावांचा पाऊस पाडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.