NZ vs SA Women's T20 World Cup 2024 : न्यूझीलंडनं पहिल्यांदाच जिंकला टी २० वर्ल्डकप, दक्षिण आफ्रिकेचं स्वप्न पुन्हा भंगलं!

Women's T20 world cup : न्यूझीलंडच्या महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत महिला टी २० वर्ल्डकप जिंकला. न्यूझीलंडचा संघ तिसऱ्यांदा टी २० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र, यावेळीही त्यांच्या पदरी निराशा पडली आणि वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.
New zealand won womens t20 world cup final
New zealand won womens t20 world cup final@T20WorldCup/X
Published On

NZ vs SA, Women's T20 World Cup Final Highlights : न्यूझीलंडचा संघ आयसीसी महिला टी २० वर्ल्डकप २०२४ विजेता ठरला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ३२ धावांनी पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं.

दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १५९ धावांचं लक्ष्य होतं. मात्र, त्यांना ९ विकेट गमावून १२६ धावाच करता आल्या. न्यूझीलंडने पहिल्यांदाच टी २० वर्ल्डकप जिंकण्याचा पराक्रम केला. तर दक्षिण आफ्रिकेचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. न्यूझीलंडला विजेतेपद जिंकून देण्यात एमेलिया केरचा मोलाचा वाटा होता. केर हिने ४३ धावा केल्या आणि ३ विकेटही घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेचा सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभव

न्यूझीलंडच्या संघानं तिसऱ्यांदा महिला टी २० वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली होती. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला होता. पण यावेळीही त्यांच्या पदरी निराशा पडली. मागील वेळी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते. फायनलमध्ये सोफी डिव्हाइन न्यूझीलंडचं नेतृत्व करत होती. तर लौस वोलवार्ड ही दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत होती.

फायनलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं चांगली सुरुवात केली होती. कर्णधार वोलवार्ड आणि ताजमिन ब्रिट्स यांनी पहिल्या विकेटसाठी ६.५ षटकांत ५१ धावांची भागीदारी केली होती. पण भागीदारी तुटली आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ दबावाखाली आला. लागोपाठ विकेट गमावल्या आणि त्यानंतर डाव सावरलाच नाही. वोलवार्ड हिने सर्वाधिक ३३ धावा केल्या. तर ब्रिट्स हिने १७ धावा आणि ट्रायोनने १४ धावा केल्या. न्यूझीलंडकडून एलेमिया केर आणि रोजमेरी मेयर यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

तत्पूर्वी टॉस जिंकून पहिली फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५ विकेटच्या बदल्यात १५८ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून एलेमिया केर हिने सर्वाधिक ४३ धावा केल्या. तिने ३८ धावांचा सामना केला. त्यात चार चौकार होते. ब्रुक हालीडे हिने तीन चौकारांच्या मदतीने २८ चेंडूंत ३८ धावा केल्या. हालीडे आणि केर यांनी चौथ्या विकेटसाठी ४४ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी रचली. सलामीवीर सूजी बेट्स हिनेही ३२ धावांचं योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेची गोलंदाज एन म्लाबा हिने दोन विकेट घेतल्या.

New zealand won womens t20 world cup final
Ind vs NZ Test : बंगळूरूमध्ये न्यूझीलंडच किंग; तब्बल 36 वर्षांनंतर भारताच्या भूमीवर किवींचा विजय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com