LSG VS GT: सामन्याआधी गुजरातला मोठा धक्का, 'हा' स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, संघाचं टेन्शन वाढलं

Glenn Phillips Ruled Out From IPL 2025: स्टार गोलंदाज कागिसो रबाडानंतर गुजरात संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार ऑलराउंडर ग्लेन फिलिप्स मायदेशी परतला आहे.
Glenn Philips
Glenn Philipsgoogle
Published On

आज आयपीएल २०२५ च्या २६ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स भिडणार आहेत. या सामन्यापूर्वी कर्णधार शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. गुजरात टायटन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. ६ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याच्या कंबरेला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर, ग्लेन फिलिप्स न्यूझीलंडला त्याच्या मायदेशी परतला आहे. अलीकडेच, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला कोपराच्या फ्रॅक्चरमुळे आयपीएल २०२५ मधून बाहेर पडावे लागले, त्यानंतर एमएस धोनी उर्वरित हंगामासाठी संघाचे नेतृत्व करत आहे.

दुखापतीमुळे ग्लेन फिलिप्स आयपीएल २०२५ मधून बाहेर

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात ग्लेन फिलिप्सला गुजरात टायटन्सने २ कोटी रुपये मोजत संघात सामील केले होते. परंतु, आतापर्यंत त्याला एकाही सामन्याच्या प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळाले नाही. ६ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याच्या सहाव्या ओव्हरमध्ये २८ वर्षीय ग्लेन बदली खेळाडू म्हणून मैदानात आला. यादरम्यान, थ्रो करताना त्याच्या स्नायूंना ताण आला. यानंतर लगेचच फिजिओ टीम मैदानात आली आणि त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. या दुखापतीपासून तो संघाच्या सरावातही दिसला नाही. त्याने एकूण ८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ६५ धावा केल्या आहेत आणि दोन विकेट घेतल्या आहेत.

Glenn Philips
Mohammed Siraj: चॅम्पियन्स ट्रॉफीची हुकलेली संधी अजूनही जिव्हारी! मोहम्मद सिराजने अखेर मौन सोडले, खंत व्यक्त करत म्हणाला...

गुजरात टायटन्सने निवेदनात काय म्हटले?

क्रिकबझच्या मते, गुजरात टायटन्सने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, ६ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यादरम्यान कंबरेच्या दुखापतीनंतर ग्लेन फिलिप्स न्यूझीलंडला परतला आहे. गुजरात टायटन्स संघाने ग्लेनला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कागिसो रबाडा देखील वैयक्तिक कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेला परतला आहे. तो कधी परत येईल हे अद्याप माहित नाही.

पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स अव्व्ल स्थानावर

आयपीएल २०२५च्या पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्यस अव्वल स्थानावर आहे. गुजरातने आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांपैकी ४ सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Glenn Philips
LSG vs GT Pitch Report : दोन तगडे संघ, दोन्ही युवा कर्णधार, लखनऊ-गुजरात भिडणार; खेळपट्टी कुणाला साथ देणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com