
दोन्ही तगडे संघ, दिग्गज खेळाडू आणि रिषभ पंत आणि शुभमन गिल हे दोन्ही युवा कर्णधार... लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आज, शनिवारी आमनेसामने येणार आहेत. गिलच्या नेतृत्वात शुभमन गिलचा गुजरात संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेण्यासाठी झुंजणार आहे. तर रिषभ पंतचा लखनऊ संघ टॉप ४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी भिडणार आहे. लखनऊनच्या मैदानात हा सामना रंगणार आहे. इथली खेळपट्टी कुणाला साथ देणार, कुणाचं पारडं जड असणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
लखनऊ विरुद्ध गुजरात यांच्यात आयपीएल २०२५ मधील २६ वा सामना आज, लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी मैदानात होत आहे. दुपारीच कडाक्याच्या उन्हात हा सामना होणार आहे. नाणेफेकीसाठी कर्णधार रिषभ पंत आणि शुभमन गिल हे मैदानात सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी येतील. लखनऊचा संघ विजयाची हॅट्ट्र्रिक साधणार का, हे पाहावं लागेल. गुजरात संघाचे अव्वल स्थान पटकावण्याचे मनसुबे असतील.तत्पूर्वी लखनऊची खेळपट्टी कुणाला साथ देणार हे पाहूयात.
लखनऊची खेळपट्टी खूपच बदलली आहे. त्यामुळे सध्या तरी ही खेळपट्टी फलंदाजीला पोषक असणार आहे. यापूर्वी ही खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल होती. पण गेल्या काही दिवसांत खेळपट्टी फलंदाजांना मदतगार ठरत आहे. हा सामना दिवसा होणार आहे. त्यामुळे पहिल्या डावात चेंडूचा वेग कमी असणार आहे. मात्र, फलंदाजांना धावा खोऱ्यानं ओढता येणार आहेत. दिवसा सामना होणार असल्यानं नाणेफेक जिंकणारा संघ पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण संध्याकाळी फलंदाजी करणं थोडं सोपं होणार आहे. त्यामुळे या मैदानात २०० हून अधिक धावा होण्याचा अंदाज आहे.
लखनऊच्या या मैदानात आयपीएलचे एकूण १६ सामने खेळवण्यात आले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं या ठिकाणी ८ सामन्यांत विजय मिळवला आहे. तर आव्हानाचा पाठलाग करताना या मैदानात सात सामन्यांत विजय मिळाला आहे.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारा संघ या ठिकाणी अधिक वेळा जिंकला आहे. तर नाणेफेक गमावणारा संघ या मैदानावर सहा वेळा जिंकला आहे. या मैदानावरची सर्वोच्च धावसंख्या २३५ आहे. तर १०८ ही सर्वात कमी धावसंख्या आहे.
आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघानं १७७ धावा करून विजय साकार केलेला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं या मैदानात सरासरी १६८ धावा केल्या आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये पाच वेळा समोरासमोर उभे ठाकले होते. त्यातील चार सामने जिंकून गुजरातनं आपला दबदबा राखला आहे. तर लखनऊने फक्त एकदा विजय मिळवला आहे. २०२४ मध्ये हा विजय मिळाला होता. आपल्या घरच्या मैदानावर सामना जिंकून लखनऊ संघ कमबॅक करू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.