Martin Guptill Retirement : २३ शतके, ७६ अर्धशतके, वर्ल्डकपमध्ये डबल सेंच्युरी; स्फोटक फलंदाजानं अचानक क्रिकेटमधून घेतला संन्यास

Martin Guptill Retirement From International Cricket : न्यूझीलंड क्रिकेट संघातील स्टार फलंदाज मार्टिन गप्टिल यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.
Martin Guptill Retirement
Martin Guptill Retirementsaam tv
Published On

युवराज सिंग, विरेंद्र सेहवाग यांच्यासारखाच विस्फोटक, मैदानात समोरच्या गोलंदाजानं फेकलेल्या चेंडूवर तुटून पडणारा, विक्रमांवर विक्रम रचणारा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकं आणि अर्धशतकं आणि धावांचा रतीब घालणारा न्यूझीलंडचा स्टार फलंदाज मार्टिन गप्टिल यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे वनडे वर्ल्डकपमध्ये कोणत्याही महारथीला जमलं नाही ते गप्टिलनं करून दाखवलं होतं. वनडे वर्ल्डकपमध्ये त्यानं द्विशतक झळकावलं होतं. याशिवाय वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना तगडा झटका मिळालाय. विक्रमवीर क्रिकेटपटू मार्टिन गप्टिलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतलाय. याबाबतची घोषणा त्यानं स्वतः केलीय. न्यूझीलंड संघाचा सलामीवीर गप्टिल यानं ऑक्टोबर २०२२ नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. तो आपल्या १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण ३६७ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यात १९८ वनडे, १२२ टी २० आणि ४७ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. मार्टिन गप्टिलने एकूण २३ शतके आणि ७६ अर्धशतके झळकावली आहेत.

मार्टिन गप्टिलची क्रिकेट कारकीर्द

मार्टिन गप्टिल ३८ वर्षांचा आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारर्किदीत एकूण १३४६३ धावा केल्या आहेत. एकदिवसीय म्हणजे वनडे क्रिकेटमध्ये ४१.७३ च्या सरासरीने ७३४६ धावा केल्या. त्यात १८ शतके आहेत. तर कसोटी कारकीर्दीत २९.३८ च्या सरासरीने २५८६ धावा केल्या.

टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून त्याचा विक्रम आहे. त्याने १२२ सामन्यांत ३१.८१ च्या सरासरीने ३५३१ धावा केल्या आहेत. त्यात २ शतके आणि २० अर्धशतके आहेत. जानेवारी २००९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्याद्वारे त्याने आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती.

वर्ल्डकपमध्ये गप्टिलच्या नावावर रेकॉर्ड

वनडे वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत एकूण तीन द्विशतके झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ख्रिस गेल आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल या दोघांनाच ही कामगिरी करता आलीय. मात्र, वर्ल्डकपच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गप्टिलच्याच नावावर आहे.

Martin Guptill Retirement
Gautam Gambhir Record: गौतम गंभीरचा रिपोर्टकार्ड! हेड कोच बनल्यापासून झालीये या १० नकोशा रेकॉर्डची नोंद

२०१५ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये त्याने ही जबरदस्त कामगिरी केली होती. वेलिंग्टनच्या मैदानावर वेस्ट इंडीजविरुद्ध त्याने २२३ चेंडूंवर २३७ धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळीत त्याने ११ षटकार आणि २४ चौकार तडकावले होते. याच वर्ल्डकप स्पर्धेत गेल याने झिम्बाब्वेविरुद्ध २१५ धावांची तुफानी खेळी केली होती.

Martin Guptill Retirement
ICC Test Rankings : जे कोणालाच नाही जमलं ते बुमराहने करून दाखवलं; BGT गाजवताच ICC ने केली मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com