Gautam Gambhir Record: गौतम गंभीरचा रिपोर्टकार्ड! हेड कोच बनल्यापासून झालीये या १० नकोशा रेकॉर्डची नोंद

Gautam Gambhir Record: राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची हेड कोच म्हणून नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान हेड कोच म्हणून कसा राहिलाय गंभीरचा रेकॉर्ड? जाणून घ्या.
Gautam Gambhir Record: गौतम गंभीरचा रिपोर्टकार्ड! हेड कोच बनल्यापासून झालीये या १० नकोशा रेकॉर्डची नोंद
Gautam GambhirBCCI (X)
Published On

भारतीय संघाने २०२४ मध्ये दमदार कामगिरी केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला भारताने कसोटी मालिकेत इंग्लंडचा ४-१ ने पराभव केला होता. त्यानंतर अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने विजय मिळवला. हे सर्व राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक असताना घडलं, त्यानंतर गौतम गंभीरकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

गंभीरने संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर, अचानक भारतीय संघाची कामगिरी खालावली आहे. दरम्यान गंभीरच्या मार्गदर्शनाखाली नको असलेले असे १० रेकॉर्ड बनवले गेले आहेत.

Gautam Gambhir Record: गौतम गंभीरचा रिपोर्टकार्ड! हेड कोच बनल्यापासून झालीये या १० नकोशा रेकॉर्डची नोंद
IND vs AUS,BGT: बुमराह एकटाच नडला! रोहित- विराट फ्लॉप, नवखा रेड्डी सुसाट; 11 खेळाडूंचं रिपोर्टकार्ड

१) १७ वर्षांनंतर श्रीलंकेने हरवलं

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असताना दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेतील एक सामना बरोबरीत राहिला होता. तर श्रीलंकेने ही मालिका २-० ने आपल्या नावावर केली होती. भारताने २७ वर्षानंतर श्रीलंकेविरुद्ध खेळताना वनडे मालिका गमावली.

२) पहिल्यांदाच पडल्या १३ विकेट्स

भारतीय संघाने पहिल्यांदाच ३ वनडे सामन्यांमध्ये ३० विकेट्स गमावल्या. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं.

Gautam Gambhir Record: गौतम गंभीरचा रिपोर्टकार्ड! हेड कोच बनल्यापासून झालीये या १० नकोशा रेकॉर्डची नोंद
Virat Kohli,IND vs AUS: कोहलीच्या फॉर्मची कसोटी! 14 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियात असं घडलं

३) ४५ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

भारतीय संघाला २०२४ मध्ये एकही वनडे सामना जिंकता आला नाही. कारण या वर्षात भारताला ३ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यापैकी २ सामने भारताने गमावले. तर एक सामना बरोबरीत राहिला.

४) न्यूझीलंडकडून पराभव

भारतीय संघाला ३६ वर्षांनंतर मायदेशात खेळताना न्यूझीलंकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी १९८६ मध्ये न्यूझीलंडने कसोटी मालिका जिंकली होती.

Gautam Gambhir Record: गौतम गंभीरचा रिपोर्टकार्ड! हेड कोच बनल्यापासून झालीये या १० नकोशा रेकॉर्डची नोंद
IND vs AUS 5th Test: एक दशकाचं 'विराट' वर्चस्व संपुष्टात! टीम इंडियाचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाने ३-१ ने मालिका जिंकली

५) चिन्नास्वामीच्या मैदानावर पहिल्यांदाच असं घडलं

भारतीय संघाला १९ वर्षांनंतर चिन्नास्वामीच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने भारताचा पराभव केला.

६) मायदेशात खेळताना पहिल्यांदाच खेळताना ५० वर ऑलआऊट

बंगळुरुच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाचा डाव अवघ्या ४६ धावांवर आटोपला होता. यासह भारतीय संघ पहिल्यांदाच मायदेशात खेळताना ५० धावांवर ऑलआऊट झाला होता.

७) पहिल्यांदाच मालिका गमावली

भारतीय संघाला पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळताना मायदेशात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Gautam Gambhir Record: गौतम गंभीरचा रिपोर्टकार्ड! हेड कोच बनल्यापासून झालीये या १० नकोशा रेकॉर्डची नोंद
Yuvraj Singh: 'माझ्या भावांना काहीच...', रोहित- विराटला ट्रोल करणाऱ्यांवर युवराज भडकला, म्हणाला..

८) १२ वर्षांनंतर पराभव

भारतीय संघाने गेल्या १२ वर्षांत एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. मात्र आता भारताला १२ वर्षांनंतर कसोटी मालिका गमवावी लागली आहे.

९) सलग २ कसोटी सामने गमावले

मायदेशात कसोटी मालिका खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला होता. मात्र १२ वर्षानंतर पहिल्यांदाच भारताने सलग २ कसोटी सामने गमावले.

१०) पहिल्यांदाच WTC फायनलमधून बाहेर

भारताने सलग २ वेळेस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र यावेळी भारतीय संघाला फायनलमध्ये प्रवेश करता आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com