NAM vs SA: OMG! इंटरनेशनॅल क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर; शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात नामिबियाने दक्षिण आफ्रिकेला हरवलं
क्रिकेटच्या इतिहासातील कदाचित सर्वात मोठ्या उलटफेरांपैकी एक घडला आहे. नामीबियाने दक्षिण आफ्रिकेला टी-20 सामन्यात 4 विकेट्सने मात दिली आहे. अंतिम बॉलपर्यंत झालेल्या या रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना 134 रन्स केले होते.
या लक्ष्याच्या पाठलाग करताना नामीबियाच्या फलंदाजाने अंतिम बॉलवर फोर मारून ऐतिहासिक विजय मिळवला. हे पहिल्यांदाच घडलंय जेव्हा दक्षिण आफ्रिकेला टी-20 मध्ये एखाद्या एसोसिएट देशाने पराभूत केलं आहे.
ही पहिलीच वेळ नाही की नामीबियाने ICC च्या कोणत्याही फुल मेंबर देशावर विजय मिळवला आहे. त्याआधी त्यांनी श्रीलंका, झिंबाब्वे आणि आयर्लंडसारख्या टीमवर विजय मिळवला आहे. काही दिवसांपूर्वीच नामीबियाने 2026 टी20 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं आहे.
डोनोवन फरेराच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 134 रन्स केले. जेसन स्मिथ टीमचे टॉप स्कोरर ठरले आणि त्यांनी 31 रन्स केले. नामीबियाच्या गोलंदाजीत रूबेन ट्रंपलमन सर्वात यशस्वी ठरला. त्याने 4 ओव्हरमध्ये केवळ 28 रन्स देऊन 3 विकेट्स घेतल्या.
दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना नामीबियाची टीम एक वेळेस पराभवाच्या काठावर होता. 84 रन्सवर त्यांनी 5 विकेट्स गमावले होत्या. पण विकेटकीपर जेन ग्रीनने दक्षिण आफ्रिकेचा टीमचा विजयाचा घास घेतला. त्यांनी दबावात 23 बॉलमध्ये नाबाद 30 रन्स केले. त्याचबरोबर रूबेन ट्रंपलमनही 11 रन्स करून नाबाद राहिला.
कशी रंगली शेवटची ओव्हर?
शेवटच्या ओव्हरमध्ये नामीबियाला विजयासाठी 11 रन्सची गरज होती. पहिल्या बॉलवर जेन ग्रीनने सिक्स लगावून दक्षिण आफ्रिकेवर तणाव वाढवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर 1 आणि 2 रन्स मिळाले. चौथ्या बॉलवर एक रन मिळाल्यामुळे दोन्ही टीम बरोबरीवर आल्या. पाचवा बॉल डॉट बॉल पडला आणि सामना अत्यंत रोमांचक वळणावर आला. अंतिम बॉलवर ग्रीनने चौकार मारून नामीबियाच्या टीमसाठी ऐतिहासिक विजय निश्चित केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.