Mohammed Shami: 'मोहम्मद शमीला अटक करु नका..'मुंबई पोलीसांना दिल्ली पोलीसांनी का केली विनंती? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Mumbai Police On Mohammed Shami: मोहम्मद शमीसाठी मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीसांनी मजेशीर ट्वीट केलं आहे.
mohammed shami
mohammed shamisaam tv news
Published On

Mumbai Police On Mohammed Shami:

क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १९ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने १० पैकी १० सामने जिंकले आहेत.

तर सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडवर ७० धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विजयात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी फलंदाजीत मोलाचं योगदान दिलं. तर न्यूझीलंडचा विजयी रथाला मोहम्मद शमीने पूर्णविराम दिला.

या सामन्यात भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक ७ गडी बाद केले. भारतीय संघाने दिलेल्या ३९८ धावांचा पाठलाग करताना केन विलियम्सन आणि डॅरील मिशेलची जोडी मैदानावर जमली होती.

एक वेळ असं वाटू लागलं होतं की, हा सामना भारतीय संघाच्या हातून निसटणार. मात्र मौक्याच्या क्षणी शमीने विलियम्सनला बाद करत भारतीय संघाला सामन्यात कमबॅक करुन दिलं आणि सामनाही जिंकून दिला. या दमदार कामगिरीमुळे त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. दरम्यान मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीसांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मजेशीर ट्वीट करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांच्या एक्स अकाऊंटवरुन मोहम्मज शमीसाठी एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना टॅग करत लिहीले की.'मुंबई पोलीस आम्हाला अशी आशा आहे की, तुम्ही मोहम्मद शमीला आज केलेल्या हल्ल्यामुळे अटक करणार नाही.' या ट्वीटवर मुंबई पोलीसांनीही मजेशीर उत्तर दिलं आहे. त्यांनी लिहीलं की,' दिल्ली पोलीस, तुम्ही असंख्य लोकांची मनं चोरण्यासाठी कलम लावायला विसरलात. यासह तुम्ही सहआरोपींची यादीही दिली नाही.' (Latest sports updates)

mohammed shami
IND vs NZ, Semi Final 2023: गिलचा गगनचुंबी षटकार,बॉल थेट ड्रेसिंग रुममध्ये!रोहितची भन्नाट रिॲक्शन Viral;Video

भारताचा जोरदार विजय...

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहलीने सर्वाधिक ११७ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. भारतीय संघाने ५० षटकअखेर ३९७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाने ७० धावांनी विजय मिळवला.

mohammed shami
World Cup 2023: ऑस्ट्रेलिया की दक्षिण आफ्रिका? कोणाला मिळेल फायनलचं तिकीट; पाहा दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com