

SRH VS CSK IPL 2023: आज आयपीएल २०२३ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना रंगणार आहे. गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघ विजय मिळवून आला आहे.
तर सनरायझर्स हैदराबाद संघाला गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात एमएस धोनीचं खेळणं कठीण दिसून येत आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ज्यावरून अंदाज व्यक्त केला जात आहे की, एमएस धोनी या सामन्यातून बाहेर होऊ शकतो.
एमएस धोनी हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय खेळांडूपैकी एक आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी देखील तो मैदानावर जोरदार कामगिरी करतोय. मात्र गेल्या काही सामन्यांपासून तो गुडघ्याच्या दुखण्याने त्रस्त असल्याचे दिसून आले आहे.
दुखापतग्रस्त असताना विकेटकीपिंग करणं कुठल्याही विकेटकीपर साठी एक मोठं आव्हान असतं मात्र तरीदेखील एमएस धोनी मैदानात येऊन विकेटकीपिंग करतोय. दरम्यान आज होणाऱ्या सामन्यापूर्वी डेव्हॉन कॉनव्हे विकेटकीपिंग करताना दिसून आला आहे.
त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, जर धोनी बाहेर झाला तर त्याच्या ऐवजी डेव्हॉन कॉनव्हे खेळताना दिसून येऊ शकतो. (Latest sports updates)
धोनीच्या अनुपस्थितीत कोण करणार चेन्नईचे नेतृत्व?
चेन्नई सुपर किंग्ज संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत. ज्यात अजिंक्य रहाणे, मोईन अली, बेन स्टोक्स आणि रवींद्र जडेजासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र अनुभव पाहता अजिंक्य रहाणेला संघाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी असा आहे चेन्नईचा संघ:
एमएसधोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, दीपक चहर, मिचेल सँटनर, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, महिश थिक्षणा,मथीशा पथिराना, प्रशांत सोलंकी, सुभेदार पट्टना. सेनापती, तुषार देशपांडे, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन, भगत वर्मा, सिमरजित सिंग, राजवर्धन हंगरगेकर, आकाश सिंग आणि अजय मंडल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.