IND VS AUS: सिराजच्या भेदक माऱ्यासमोर लाबुशेनवर आली बॅट सोडून पळण्याची वेळ; पाहा नेमकं काय घडलं -VIDEO

Mohammed Siraj And Marnus Labuschagne: मोहम्मद सिराज हा लाबुशेनला आपल्या गोलंदाजीने प्रश्न विचारताना दिसून आला.
marnus labuschagne
marnus labuschagnetwitter
Published On: 

IND VS AUS WTC FINAL 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. ओव्हलच्या मैदानावर या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांनी दमदार सुरुवात केली. दरम्यान मोहम्मद सिराज हा लाबुशेनला आपल्या गोलंदाजीने प्रश्न विचारताना दिसून आला.

marnus labuschagne
WTC Final IND vs AUS : टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सलग दुसऱ्यांदा इंग्लंडमध्ये का? चकीत करणारी माहिती आली समोर

सुरुवातीच्या एका तासात ऑस्ट्रलियाचे फलंदाज संघर्ष करताना दिसून आले होते. मोहम्मद सिराजने चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. त्याने उस्मान ख्वाजाला बाद करत माघारी धाडले. त्याच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक केएस भरतने भन्नाट झेल टिपला.

सिराजचा भन्नाट चेंडू..

ऑस्ट्रेलियाला ख्वाजाच्या स्वरूपात मोठा धक्का बसला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला डाव सावरायची गरज होती. डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन हे दोघेही डाव सावरण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर मार्नस लाबुशेन दुखापतग्रस्त होता होता थोडक्यात बचावला. (Latest sports updates)

या डावातील आठवे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला होता. त्याने मार्नस लाबुशेनला शॉर्ट ऑफ लेन्थ चेंडू टाकला. तो शॉट खेळण्याच्या तयारीत होता. मात्र शेवटच्या क्षणी त्याने मागे हटण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेंडू त्याच्या अंगठ्याला जाऊन लागला. हा चेंडू इतका जोरदार लागला की, मार्नस लाबुशेनला बॅट फेकून द्यावी लागली.

चेंडू लागताच तो वेदनेने कळवळताना दिसून आला. त्यावेळी फिजिओला मैदानात यावं लागलं होतं. त्याला चेंडू लागताच ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात चिंतेचं वातावरण होतं. कारण मार्नस लाबुशेन हा संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. मात्र तो २६ धावांवर फलंदाजी करत असताना मोहम्मद शमीने त्याला क्लीनबोल्ड करत माघारी धाडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.