LSG vs RCB Highlights : स्टॉयनिस-पूरनने आरसीबीला धुतलं; शेवटच्या चेंडूवर लखनौचा थरारक विजय

LSG vs RCB Match Result : लखनौ सुपर जायंट्सने रॉयल्स चॅलेंजर बंगळुरूवर १ विकेट्सनी थरारक विजय मिळवला आहे.
LSG vs RCB Match Result
LSG vs RCB Match ResultSaam TV
Published On

LSG vs RCB Highlights : मार्कस स्टॉयनिसच्या ३० चेंडूत ६० धावा आणि मधल्या फळीचा फलंदाज निकोलस पूरनची १९ चेंडूत ६२ धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूवर १ विकेट्सनी थरारक विजय मिळवला. आरसीबीचा यंदाच्या हंगामातील हा सलग दुसरा पराभव आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने लखनौला विजयासाठी २१३ धावांचे आव्हान दिले होते.  (Latest sports updates)

LSG vs RCB Match Result
Virat Kohli Six Video: विराट कोहलीचा पुन्हा अविश्वसनीय षटकार! पाहून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले

या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौची सुरूवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर काईल मेयर्स आणि केएल राहुलला मोहमद सिराजने झटपट माघारी पाठवलं. त्यानंतर सिराजने वेन पार्नेलने दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्याला बाद केलं. पावरप्लेमध्ये एकवेळी लखनौची ३ बाद २३ अशी झाली होती.

मात्र, त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मार्कस स्टॉयनिसने आरसीबीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. स्टॉयनिसने चौफर फटकेबाजी केली. तो ३० चेंडूत ६५ धावा काढून बाद झाला. दरम्यान, स्टॉइनिस बाद झाल्यानंतर आरसीबीच्या विजयाच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या निकोलस पूरनने आरसीबीच्या गोलंदाजांची हवाच काढून टाकली.

निकोलस पूरनने मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याने १५ चेंडूतच आपलं अर्धशतक पूर्ण केलं. निकोलस पूरन १९ चेंडूत ६२ धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ७ खणखणीत षटकार आणि ४ चौकार खेचले. त्याला आयुष बदोनीने २४ चेंडूत ३० धावा चांगली साथ दिली. आरसीबीने दिलेले २१३ धावांचे आव्हान लखनौने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. आरसीबीकडून मोहमद सिराजने आणि वेन पार्नेलने प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेलने २ विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबी संघाने डावाची सुरूवात चांगली केली. घरच्या मैदानावर विराट कोहली आणि फाफ ड्यू प्लेसिसने लखनौच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी मिळून पहिल्या विकेट्साठी ९६ धावांची भागीदारी केली. विराट ४४ चेंडूत ६१ धावा काढून बाद झाला.

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक खेळी करत आरसीबीचा स्कोरअरबोर्ड धावता ठेवला. मॅक्सवेल २९ चेंडूत ५९ धावा करून बाद झाला. त्याने ६ षटकार आणि ३ चौकार लगावले.

एका बाजूने डुप्लेसीसने खिंड लढवत संघाचा स्कोअर २०० च्या पार पोहोचवला. डुप्लेसीस शेवटपर्यंत नॉटआऊट राहिला. त्याने ४६ चेंडूत ७९ धावांची मोठी खेळी खेळली. आरसीबीच्या सुरुवातीच्या तीन फलंदाजांनी मिळूनच लखनऊसमोर २१२ धावांच आव्हान ठेवलं होतं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com