LSG vs DC, IPL 2024: आयुष बदोनी बनला लखनऊसाठी संकटमोचक! दिल्लीसमोर ठेवलं १६८ धावांचं आव्हान

LSG vs DC 1st Inning: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २६ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.
LSG vs DC, IPL 2024:आयुष बदोनी बनला लखनऊसाठी संकटमोचक! दिल्लीसमोर ठेवलं १६८ धावांचं आव्हान
LSG vs DC IPL 2024 lucknow super giants vs delhi capitals live updates amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २६ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटकअखेर १६७ धावा केल्या आहेत.

या सामन्यात केएल राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊला क्विंटन डीकॉक स्वरुपात पहिला धक्का बसला. क्विंटन डी कॉक १९ धावांवर बाद होऊन माघारी परतला. तर केएल राहुलने ३९ धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कल ३, मार्कस स्टोइनिस ८, निकोसल पूरन शून्यावर बाद होऊन परतला. शेवटी युवा फलंदाज आयुष बदोनी ने ३५ चेंडूंचा सामना करत नाबाद ५५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या १६७ धावांवर पोहचवली.

LSG vs DC, IPL 2024:आयुष बदोनी बनला लखनऊसाठी संकटमोचक! दिल्लीसमोर ठेवलं १६८ धावांचं आव्हान
LSG vs DC, IPL 2024: लखनऊला हरवण्यासाठी दिल्लीच्या संघात होणार मोठा बदल? अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग ११..

लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पांड्या, निकोलस पूरन, आयुष बदोनी, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर

LSG vs DC, IPL 2024:आयुष बदोनी बनला लखनऊसाठी संकटमोचक! दिल्लीसमोर ठेवलं १६८ धावांचं आव्हान
LSG vs DC, IPL 2024: दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी लखनऊचं टेन्शन वाढलं! मयांक यावदबाबत समोर आली मोठी अपडेट

दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, शाई होप, रिषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क इशांत शर्मा, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com