
LSG VS CSK News : एकाना स्टेडियमवर आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉसनंतर दोन्ही संघांची प्लेईंग ११ समोर आली आहे. प्लेऑफच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे चेन्नईच्या संघासाठी आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला टेबलवर टॉप कामगिरीसाठी लखनऊचा संघ सज्ज झाला आहे.
लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने आयपीएल २०२५ मध्ये एकूण सहा सामने खेळले आहेत. यातील ४ सामन्यात लखनऊचा विजय झाला तर २ सामने त्यांनी गमावले. पॉईंट्स टेबलवर वरच्या स्थानी जाण्यासाठी लखनऊ प्रयत्नशील असणार आहे. दुसऱ्या बाजूला ५ पैकी ४ सामने गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा संघ दुसऱ्या विजयाच्या शोधात आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या संघामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. डेव्हिड कॉनवे आणि रविचंद्रन अश्विनला प्लेईंग ११ मधून वगळण्यात आले आहे. शेख रशीद आणि जेमी ओवर्टन यांना संधी देण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाडच्या जागेवर राहुल त्रिपाठी तिसऱ्या नंबरवर खेळणार आहे. दुसऱ्या बाजूला लखनऊ सुपर जायंट्समध्ये एकमेव बदल झाला आहे. सलामीवीर मिचेल मार्श परतला आहे. लेक आजारी पडल्याने त्याने मागचा सामना खेळला नव्हता.
लखनऊ सुपर जायंट्सची प्लेईंन ११ -
रिषभ पंत (कर्णधार), एडन मारक्रम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समाद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश राठी, आकाश दीप, आवेश खान
चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -
एमएस धोनी (कर्णधार), शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, जेमी ओवर्टन, रवींद्र जडेजा, खलील अहमद, नूर अहमद, अंशुल कम्बोज, मथीश पाथीराना
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.