
भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या तिसरा टेस्ट सामना सुरु आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर हा सामना खेळवण्यात येतोय. मात्र हा सामना थरारक सिनेमासारखा वाटतोय. तिसऱ्या दिवशी या सामन्यात चांगलाच ड्रामा झाला. तर चौथ्या दिवसाच्या शेवटीही दोन्ही टीममध्ये तणाव दिसून आला. आता पाचव्या दिवशी या सामन्याचा निकाल लागणार आहे आणि दोन्ही टीम्समध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.
इंग्लंडने भारतासमोर १९३ रन्सचं लक्ष्य ठेवलं आहे. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडिया मैदानावर उतरली. पण चौथ्या दिवसाच्या अखेरपर्यंत भारताने केवळ १०० रन्समध्ये चार महत्त्वाचे फलंदाज गमावले आहेत. यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, आकाश दीप आणि करुण नायर हे सर्व कमी रन्समध्ये बाद झाले. सध्या केएल राहुल आणि ऋषभ पंत मैदानावर टिकून आहेत, आणि त्यांच्यावरच भारताची जमेची बाजू अवलंबून आहे.
भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत इंग्लंडला कमी रन्समध्ये रोखलं आहे. वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले. तर नितीश रेड्डी आणि आकाश दीप यांच्या खात्यात प्रत्येकी १ विकेट आली आहे. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक ४० रन्स केल्या आणि त्याच्याच जोरावर इंग्लंडने १९३ रन्सचं आव्हान भारतासमोर ठेवलं.
लॉर्ड्समध्ये या सामन्यात अंपायरिंगवरूनही जोरदार चर्चा रंगलीये. अनेक निर्णय इंग्लंडच्या बाजूने गेले असं भारतीय चाहत्यांचं मत आहे. विशेषतः आकाश दीपला दोनदा चुकीच्या पद्धतीने आउट दिलं गेलंय. जे नंतर रिव्ह्यूद्वारे नॉटआउट सिद्ध झालं. बॉलिंगदरम्यानसुद्धा अनेक अपील्समध्ये भारताला रिव्ह्यू घ्यावा लागला. एक महत्वाचा विकेट तर ‘अंपायर्स कॉल’मुळे हुकला.
चौथ्या दिवसाअखेर पिचमध्ये बरेच बदल झाले होते. त्यामुळे फलंदाजी करणे कठीण बनले. भारतीय फलंदाजांची कामगिरीही त्यामुळे काहीशी डळमळीत वाटली. मात्र केएल राहुलने एक बाजू संभाळून ठेवली आहे. त्यामुळे लॉर्डच्या मैदानावर भारत ऐतिहासिक विजय मिळवण्याची शक्यता आहे. पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी अजून १३५ रन्स करावे लागतील. सध्या ऋषभ पंत, केएल राहुल आणि नितीश रेड्डी या तिघांवर भारताची शेवटची आशा टिकून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.