लिओनेल मेस्सीला पितृशोक, ६८ वर्षी जॉर्ज मेस्सी यांचे निधन

Lionel Messi Father Passes Away: फुटबॉलचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी यांचे वडील जॉर्ज मेस्सी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. दीर्घ आजारानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जॉर्ज यांचे निधन झाले.
Lionel Messi with his father Jorge Messi, who passed away at the age of 68 in Rosario.
Lionel Messi with his father Jorge Messi, who passed away at the age of 68 in Rosario.
Published On
Summary
  • लिओनेल मेस्सी यांचे वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले.

  • रोझारियो येथील एका क्लिनिकमध्ये त्यांचे निधन झाल्याची माहिती

  • र्जेंटिनातील वृत्तांनुसार, स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी रात्री १० वाजता त्यांचे निधन झाले.

दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांना पितृशोक झालाय. त्यांचे वडील जॉर्ज यांचे दीर्घ आजारामुळे त्यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. मेस्सीचे जन्मगाव असलेल्या रोझारियो येथे त्यांचे निधन झाले. अर्जेंटिनामधील वृत्तांनुसार, एका आजारावर ते उपचार घेत होते, त्यात त्यांचे निधन झाले. स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी रात्री १० वाजता एका क्लिनिकमध्ये त्यांचे निधन झाले.

मेस्सीचा बालपणीचा क्लब 'न्यूवेल्स ओल्ड बॉईज'ने शनिवारी एका अधिकृत निवेदनाद्वारे या अर्जेंटिनी सुपरस्टारच्या वडिलांच्या निधनाची पुष्टी केली. मेस्सी किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून मात्र अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com