KKR vs RR Match Result: एकटा जयस्वाल अख्ख्या KKR संघावर पडला भारी! तोड फोड खेळी करत संघाला मिळवून दिला विजय

KKR vs RR Match Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ५६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.
kkr vs rr
kkr vs rrsaam tv
Published On: 

KKR VS RR IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ५६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून यशस्वी जयस्वालने तुफान फटकेबाजी करत राजस्थान रॉयल्स संघाला ९ गडी राखून विजय मिळवून दिला आहे.

या विजयासह राजस्थान रॉयल्स संघ मुंबई इंडियन्सला मागे सोडत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

kkr vs rr
IPL Viral Video: बेरोजगार तरुणाची मुलींच्या पालकांकडे खास मागणी! स्टेडियमधील ‘तो’ Video व्हायरल

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाकडून वेंकटेश अय्यरने ४२ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले.

तर कर्णधार नीतीश राणाने १७ चेंडूंचा सामना करत २२ धावांची खेळी केली. तर रहमानुल्लाह गुरबाजने १८ आणि रिंकू सिंगने १६ धावांची खेळी केली. या डावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटक अखेर ८ गडी बाद १४९ धावा केल्या होत्या.

ईडन गार्डनची आऊटफिल्ड खूप फास्ट आहे. चेंडू गॅपमध्ये गेला की ४ धावा गेल्याशिवाय तो चेंडू थांबतच नाही. अशा परिस्थितीत १५० धावांचे आव्हान खूप कमी होती. यशस्वीने संघाला जोरदार सुरुवात करून दिली.

नीतीश राणाच्या पहिल्याच षटकात त्याने एकूण २६ धावा ठोकल्या. त्याने या डावात ४७ चेंडूंचा सामना करत नाबाद ९८ धावांची खेळी केली. तर कर्णधार संजू सॅमसनने २९ चेंडूंचा सामना करत २ चौकार आणि ५ षटकारांचा साहाय्याने ४८ धावांची खेळी केली. राजस्थान रॉयल्स संघाने या सामन्यात ९ गडी आणि ४१ चेंडू शिल्लक ठेऊन हा सामना जिंकला. (Latest sports updates)

kkr vs rr
IPL Points Table: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

यशस्वी ठरला विजयाचा शिल्पकार..

यशस्वी जयस्वालने आयपीएल २०२३ स्पर्धेत आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेतील १२ सामन्यांमध्ये ५७५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ४ अर्धशतके झळकावली आहे. त्याने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात तुफानी शतक झळकावले होते. त्याची ही कामगिरी पाहता लवकरच तो भारतीय संघासाठी खेळताना दिसून येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com