KKR VS RCB MATCH PREDICTION: आजच्या सामन्यात 'हे' 11 खेळाडू तुम्हाला करु शकतात मालामाल..

KKR VS RCB IPL 2023 MATCH PREDICTION: कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत
KKR VS RCB team prediction
KKR VS RCB team prediction Saam Tv
Published On: 

KKR VS RCB Team Prediction And Pitch Report: आयपीएल 2023 स्पर्धेतील नवव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असणार आहे. कारण पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाकडून कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

KKR VS RCB team prediction
Will IPL 2023 Cancel: आयपीएल 2023 स्पर्धा रद्द होणार? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने देखील आपल्या पहिल्या सामन्यात 5 वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केले होते. या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने तूफान फटकेबाजी करत आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता.

आता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यातही अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे. (Latest sports updates)

KKR VS RCB team prediction
Kane Williamson Injury: IPL खेळणं पडलं महागात! न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन मोठ्या स्पर्धेला मुकणार..

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याबद्दल अधिक माहिती..

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना क्रमांक 9

सामन्याचे ठिकाण: ईडन गार्डन्स, कोलकाता

सामन्याची तारीख आणि वेळ: 6 एप्रिल, संध्याकाळी 7:30 वाजता.

इथे पाहू शकता लाईव्ह: स्टार स्पोर्ट्स लाईव्ह, जिओ सिनेमा.

KKR VS RCB team prediction
IPL स्पर्धेवर कोरोनाचं सावटं! कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने लीग होणार रद्द?

हे 11 खेळाडू करू शकतात जोरदार कामगिरी ..

यष्टीरक्षक: रहमानउल्ला गुरबाज.

फलंदाज : व्यंकटेश अय्यर

अष्टपैलू खेळाडू: आंद्रे रसल, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल ब्रेसवेल.

गोलंदाज : टीम साऊदी, वरूण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा.

कर्णधार : विराट कोहली.

उपकर्णधार : मिचेल ब्रेसवेल.

KKR VS RCB team prediction
IPL 2023 WATCH: गब्बरच्या रॉकेट शॉटने आपल्याच फलंदाजाला केलं दुखापतग्रस्त! शेवटी सोडावं लागलं मैदान - VIDEO

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11:

कोलकाता नाइट रायडर्स: मनदीप सिंग, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), अनुकुल रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर/कुलवंत खेजरोलिया, उमेश यादव, टीम साऊदी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक ), सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, आकाश दीप, डेव्हिड विली, कर्ण शर्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.