KKR vs LSG, Playing XI: एक राणा इन तर दुसरा आऊट! LSG विरुद्ध KKR ची प्लेइंग ११ बदलणार?

Kolkata knight Riders Playing XI: आज होणाऱ्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा संघ आमने सामने येणार आहे.
KKR vs LSG, Playing XI: एक राणा इन तर दुसरा आऊट! LSG विरुद्ध KKR ची प्लेइंग ११ बदलणार?
KKR vs LSG IPL 2024 kolkata knight riders playing 11 prediction amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात चेन्नईचा संघ मुंबई इंडियन्स संघाला आव्हान देताना दिसून येणार आहे. तर पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा संघ आमने सामने येणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११ ? जाणून घ्या.

नितीश राणाला संधी मिळणार?

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघात एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो. या सामन्यात वेंकटेश अय्यरला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी नितीश राणाला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. हा एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो. तर वेगवान गोलंदाज हर्षित राणा देखील पूर्णपणे फिट झाला असून कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. मात्र त्याला कोणाच्या जागी संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

KKR vs LSG, Playing XI: एक राणा इन तर दुसरा आऊट! LSG विरुद्ध KKR ची प्लेइंग ११ बदलणार?
LSG vs DC, IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सने लखनौचा 6 गडी राखून केला पराभव; ऋषभ पंतच्या संघाचा दुसरा विजय

फलंदाजांची दमदार कामगिरी...

कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या फलंदाजांनी या हंगामात दमदार खेळ केला आहे. या संघात एकापेक्षा एक विस्फोटक फलंदाज आहेत. सलामीला येणारे फिल सॉल्ट आणि सुनील नरेन संघाला आक्रमक सुरुवात करून देतात. त्यानंतर श्रेयस अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसल,वेंकटेश अय्यर आणि रिंकू सिंगसारखे विस्फोटक फलंदाज शेवटी तुफान फटकेबाजी करतात.

KKR vs LSG, Playing XI: एक राणा इन तर दुसरा आऊट! LSG विरुद्ध KKR ची प्लेइंग ११ बदलणार?
MI vs CSK, Head To Head Record: आयपीएल स्पर्धेतील El Clasico! मुंबई- चेन्नई आज भिडणार; कोणाचं पारडं राहिलय जड?

या सामन्यासाठी अशी असू शकते कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेइंग ११..

सुनील नरेन, फिल सॉल्ट (यष्टिरक्षक), अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, नितीश राणा, रमनदीप सिंग/वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

इम्पॅक्ट प्लेअर- वैभव अरोड, सुयाष शर्मा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com