GT vs KKR सामना रद्द झाल्यानंतर गुजरात टायटन्सची मोठी घोषणा; फॅन्ससाठी घेतला हा निर्णय

GT vs KKR, IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. दरम्यान हा सामना रद्द झाल्यानंतर गुजरात टायटन्सने मोठी घोषणा केली आहे.
GT vs KKR सामना रद्द झाल्यानंतर गुजरात टायटन्सची मोठी घोषणा; फॅन्ससाठी घेतला हा निर्णय
kkr vs gt match cancelled due to rain ticket holders will refund their all money amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६३ व्या सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये खेळला जाणार होता. या सामन्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खास तयारी देखील करण्यात आली होती. मात्र पावसाने सर्व मेहनतीवर पाणी फेरलं. प्लेऑफच्या शर्यतीत टीकून राहण्यासाठी गुजरात टायटन्स संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. मात्र जोरदार पावसामुळे एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा सामना रद्द झाल्यानंतर गुजरात टायटन्स संघाने मोठी घोषणा केली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत करुन गुजरात टायटन्स संघाला प्लेऑफच्या शर्यतीती टीकून राहण्याची संधी होती. मात्र ही संधी पावसामुळे निसटली आहे. यासह गुजरातचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा तिसरा संघ ठरला आहे. मैदानात जोरदार पाऊस पडत होता. मात्र तरीही सामना पाहण्याासाठी आलेल्या चाहत्यांनी मैदान सोडलं नाही. अखेर सामना रद्द केल्यानंतर गुजरात टायटन्स संघाने तिकीटधारकांना त्यांचे सर्व पैसे परत करणा असल्याची घोषणा केली आहे.

GT vs KKR सामना रद्द झाल्यानंतर गुजरात टायटन्सची मोठी घोषणा; फॅन्ससाठी घेतला हा निर्णय
IPL 2024 Playoffs Scenario: मुंबई,पंजाबसह गुजरात स्पर्धेतून बाहेर! ३ स्थानांसाठी ६ संघांमध्ये चुरशीची लढत

या सामन्यानंतर बोलताना गुजरात टायटन्स संघाने मुख्य संचालन अधिकारी कर्नल अरविंद सिंग म्हणाले की, ' पावसाने व्यत्यय आणल्याने हा सामना होऊ शकलेला नाही, याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतंय. परंतु, गुजरात टायटन्यच्या चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याच आम्ही सम्नान करतो. म्हणून आम्ही सर्व तिकिटधारकांना तिकीटांची संपूर्ण रक्कम परत करणार आहोत. '

GT vs KKR सामना रद्द झाल्यानंतर गुजरात टायटन्सची मोठी घोषणा; फॅन्ससाठी घेतला हा निर्णय
RCB, IPL 2024: CSK विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का! संघातील २ प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर

पैसे परत कसे मिळतील?

तिकीटांचे पैसे मिळवण्यासाठी तिकीट तुमच्या जवळ असणं अतिशय महत्वाचं आहे. तिकीट हरवलं असेल किंवा फाटलं असेल, तर पैसे परत मिळणार नाहीत. १४ मे रोजी पेटीएम इन्साईडरद्वारे इमेल किंवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती शेअर केली जाईल. हा गुजरात टायटन्स घरच्या मैदानावर शेवटचा सामना होता. त्यामुळे संघातील सर्व खेळाडू सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट चाहत्यांचं आभार मानताना दिसून आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com