GT vs KKR, IPL 2024: आज कोलकाता - गुजरात भिडणार! असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

GT vs KKR, Head To Head Record: आज होणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
GT vs KKR, IPL 2024: आज कोलकाता - गुजरात भिडणार! असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड
KKR vs GT IPL 2024 head to head record playing 11 amd2000twitter

आयपीएल स्पर्धेत लवकरच साखळी फेरीतील सामने संपून प्लेऑफच्या सामन्यांना प्रारंभ होणार आहे. २१ मे पासून प्लेऑफच्या सामन्यांना प्रारंभ होणार आहे. दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड.

गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरला होता. या सामन्यात गुजरातकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शनने चेन्नईच्या फलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी शतकी खेळी केली आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. या सामन्यातही दोन्ही फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

GT vs KKR, IPL 2024: आज कोलकाता - गुजरात भिडणार! असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड
IPL 2024 RCB vs DC: दिल्लीचा पराभव का झाला? कारण सांगतांना संतापला कर्णधार अक्षर पटेल

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांना जास्त सामने खेळले गेलेले नाहीत. हे दोन्ही संघ केवळ ३ सामने खेळण्यासाठी आमने सामने आले आहेत. यादरम्यान गुजरात टायटन्स संघाने २ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.

GT vs KKR, IPL 2024: आज कोलकाता - गुजरात भिडणार! असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड
IPL 2024 Points Table: RCB च्या विजयाने CSKचं टेन्शन वाढलं! पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

असे आहेत दोन्ही संघ

कोलकाता नाईट रायडर्स - फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमनदीप सिंग, मिशेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, अनुकूल रॉय, सुयश शर्मा, रहमानुल्लाह गुरबाज़, अंगकृष रघुवंशी, मनीष पांडे, दुशमंथा चमीरा, श्रीकर भरत, चेतन सकारिया, शेरफेन रदरफोर्ड, साकिब हुसैन, अल्लाह ग़ज़नफ़र

गुजरात टायटन्स- टीम शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शाहरुख खान, डेविड मिलर, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी, संदीप वारियर, अभिनव मनोहर, शरथ बीआर, दर्शन नालकांडे, जयंत यादव, जोशुआ लिटिल, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेंसर जॉनसन, अजमतुल्लाह उमरजई, मानव सुथार, सुशांत मिश्रा, विजय शंकर, केन विलियमसन, रिद्धिमान साहा।

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com