Venkatesh Iyer: भारताचा स्टार खेळाडू डॉक्टर बनणार! IPL लिलावात लागली होती रेकॉर्डब्रेक बोली

Venkatesh Iyer Doctor News: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यर डॉक्टर बनणार आहे.
Venkatesh Iyer: भारताचा स्टार खेळाडू डॉक्टर बनणार! IPL लिलावात लागली होती रेकॉर्डब्रेक बोली
venkatesh iyeryandex
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात वेंकटेश अय्यरची हवा पाहायला मिळाली. या लिलावात कोलकताना नाईट रायडर्सने त्याला संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावला. अखेर २३.७५ कोटी मोजत कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपल्या संघात घेतलं.

यासह वेंकटेश अय्यर या स्पर्धेच्या इतिहासातील चौथा सर्वात महागडा खेळाडू ठरला. येत्या काही दिवसांत तो पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्सच्या जर्सीत खेळताना दिसेल. दरम्यान या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी त्याने आपल्या शिक्षणाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

Venkatesh Iyer: भारताचा स्टार खेळाडू डॉक्टर बनणार! IPL लिलावात लागली होती रेकॉर्डब्रेक बोली
IND vs AUS: हेड - सिराज प्रकरण पेटलं! ICC कारवाई करणार; पण नेमकी कुणावर?

आयपीएल स्पर्धेतून कोट्यवधींची कमाई करणाऱ्या अय्यरने म्हटले की, क्रिकेटसह शिक्षणही तितकंच महत्वाचं आहे. त्याच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने MBA चे शिक्षण घेतले आहे. आता तो PhDचं शिक्षण घेत आहे. त्याला यापूर्वी Deloitte कंपनीकडून जॉबची ऑफर आली होती. मात्र त्याने ही ऑफर नााकारली होती. आता तो आपलं PhDचं शिक्षण घेत आहे.

Venkatesh Iyer: भारताचा स्टार खेळाडू डॉक्टर बनणार! IPL लिलावात लागली होती रेकॉर्डब्रेक बोली
IND vs AUS: भारताला मालिका जिंकायची असेल तर संघात हे 4 बदल करावेच लागतील

काय म्हणाला वेंकटेश अय्यर?

वेंकटेश अय्यरने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ' मला वाटतं, क्रिकेटपटूंनी शिक्षण घ्यायला हवं. जर तुम्हाला पदवीचे किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली, तर तुम्ही ते करायला हवं. मी सध्या PhD करतोय. इथून पुढे मुलाखतींमध्ये तुम्ही डॉक्टर वेंकटेश अय्यरची मुलाखत घ्या.'

क्रिकेटसह वेंकटेश अय्यर शिक्षणालाही तितकंच महत्व देतो. याबाबत बोलताना तो म्हणाला की, ' मी सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे मी, क्रिकेट खेळतोय हे माझ्या कुटुंबाला समजावून सांगणं कठीण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, मी क्रिकेटसह शिक्षणालाही तितकंच महत्व देतो.'

तसेच तो पुढे म्हणाला की,' क्रिकेटपटू म्हणून एक मर्यादीत वेळ असतो. कारण तुम्ही वयाच्या ६० वर्षांपर्यंत क्रिकेट खेळू शकत नाही. क्रिकटमधून निवृत्त झाल्यानंतर जर तुम्हाला पुढे जायचं असेल, तर शिक्षण झालेलं असणं गरजेचं आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com