Venkatesh Iyer Marriage: शुभमंगल सावधान! KKRचा चॅम्पियन खेळाडू अडकला विवाह बंधनात - Photo

Venkatesh Iyer Marriage Photos: कोलकाता नाईट रायडर्स संघाला चॅम्पियन बनवणारा खेळाडू लग्र बंधनात अडकला आहे.
Venkatesh Iyer Marriage: शुभमंगल सावधान! KKRचा चॅम्पियन खेळाडू अडकला विवाह बंधनात - Photo
venkatesh iyer marriage photostwitter

काही दिवसांपूर्वीच आयपीएल २०२४ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादला धूळ चारत जेतेपदावर नाव कोरलं. कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात वेंकटेश अय्यरनेही मोलाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याने २६ चेंडूंचा सामना करत ५२ धावांची तुफानी खेळी गेले. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले होते. दरम्यान त्याच्या विवाह सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

वेंकटेश अय्यर अडकला विवाह बंधनात

कोलकाता नाईट रायडर्स संघाला चॅम्पियन बनवल्यानंतर आता वेंकटेश अय्यर विवाह बंधनात अडकला आहे. त्याच्या विवाह सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत. दोघांनीही भारतीय परंपरेनुसार विवाह केला आहे. या फोटोवर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत त्यांना शुभेच्छा देताना दिसून येत आहेत.

Venkatesh Iyer Marriage: शुभमंगल सावधान! KKRचा चॅम्पियन खेळाडू अडकला विवाह बंधनात - Photo
IPL 2025 Mega Auction: मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंना रिटेन करता येणार? फ्रेंचाईजींचं टेन्शन वाढलं!

आयपीएल २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी

वेंकटेश अय्यरने आयपीएल २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी केली. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व करताना ४ अर्धशतकं झळकावली. क्वालिफायर आणि फायनलच्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. फायनलमध्ये त्याने अर्धशतकी खेळी केली. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला भारतीय संघाकडून २ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. यासह त्याने ९ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यासह आयपीएल स्पर्धेतील ५० सामन्यांमध्ये त्याने ३१.५७ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत.

Venkatesh Iyer Marriage: शुभमंगल सावधान! KKRचा चॅम्पियन खेळाडू अडकला विवाह बंधनात - Photo
IND vs BAN, Warm Up Match: पहिला पेपर पास! टीम इंडियाचा बांगलादेशवर दणदणीत विजय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com