१६ वर्षांची कारकीर्द, १९३४६ धावा, ४८ शतके; मैदानातून बाहेर येताच 'रनमशीन' क्रिकेटपटूनं केली निवृत्तीची घोषणा

Kane Williamson retirement : न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू केन विलियमसन यानं इंग्लंड दौऱ्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
केन विलियमसन निवृत्त, लॉर्ड्स कसोटी संपताच घोषणा
Kane Williamsonsaam tv
Published On

क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडूंच्या यादीत नाव असलेला न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियमसन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड दौऱ्यात लॉर्ड टेस्टनंतर त्यानं ही घोषणा केली. न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून तो आधीच दूर होता. त्यात आता कसोटीमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे.

केन विलियमसन हा जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक. न्यूझीलंड संघाचं कर्णधारपदही त्यानं भूषवलं आहे. इंग्लंड दौऱ्यावरच लॉर्ड्सवरील कसोटी सामना संपल्यानंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. १६ वर्षांच्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यानं एकूण १९३४६ धावा केल्या. यात त्यानं ४८ शतके ठोकली आहेत. आता निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे, अशी भावुक प्रतिक्रिया त्यानं दिली.

मी गेल्या काही दिवसांपासून याचाच विचार करत होतो. आता योग्य वेळ आली आहे, हे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झालं होतं. मला नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातून खेळायचे होते. मी न्यूझीलंडकडून जे सामने खेळलो त्यात मी १०० टक्के योगदान दिले आहे, याचा मला निश्चितच आनंद आहे, असं विलियमसन म्हणाला. मला जेव्हा वाटलं तेव्हा मी निवृत्त होत आहे, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. न्यूझीलंड संघाचं भविष्य खूप चांगलं असेल. संघात खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. या संघाचा दीर्घकाळ भाग असणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. हीच गोष्ट माझ्या हृदयाच्या जवळ कायम राहील, असंही तो म्हणाला.

केन विलियमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंड संघानं २०१९ च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. तर विलियमसन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. विशेष म्हणजे विलियमसनला २०१९ मध्ये आयसीसी टेस्ट प्लेअर ऑफ द अॅवार्डनं गौरवण्यात आलं होतं. त्यानं कसोटीत ९५१५ धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये ७२५६ धावा केल्या. टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांत २५७५ धावा केल्या. त्याच्याच नेतृत्वात न्यूझीलंड संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ठरला आहे.

केन विलियमसन निवृत्त, लॉर्ड्स कसोटी संपताच घोषणा
India vs Afghanistan: हार्दिक पंड्या OUT, कोणत्या खेळाडूची होणार एन्ट्री? पाहा अफगाणिस्ताविरूद्ध्या वनडेसाठी कशी असेल प्लेईंग ११

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com