Asian Games 2023: 'तिला डायरेक्ट एंट्री मग आम्हाला ट्रायल्स का?' Vinesh Phogat चं नाव जाहीर होताच अंतिम पंघालने उपस्थित केला प्रश्न

Antim Panghal On Vinesh Phogat Selection: विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना थेट प्रवेश मिळताच अंतिम पंघालने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले आहे
antim phangal
antim phangalsaam tv
Published On

Vinesh Phogat In Asian Games 2023: आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. या दोघांना थेट प्रवेश मिळताच अंडर २० वर्ल्ड चॅम्पियन अंतिम पंघालने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले आहे.

अंतिम पंघालचं (Antim Phangal) असं म्हणणं आहे की, केवळ तिच नव्हे तर ५३ किलोग्रॅम वजनी गटातील अनेक असे खेळाडू आहेत जे विनेश फोगाटला पराभूत करू शकतात. उर्वरित खेळाडू २२ आणि २३ जुलै दरम्यान ट्रायल्ससाठी मैदानात उतरणार आहेत.

antim phangal
Team India Playing 11: आता विंडीजचं काही खरं नाही! दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात धाकड खेळाडूची एंट्री; पाहा प्लेइंग 11

हिसारमध्ये राहणारी १९ वर्षीय अंतिम पंघाल ५३ किलोग्रॅम वजनी गटात खेळण्यासाठी मैदानात उतरते. तिने प्रश्न विचारत म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून सरावापासून दूर असतानाही विनेशची निवड कशी काय झाली? याबाबत बोलताना ती म्हणाली की, 'विनेश फोगाटला (Vinesh Phogat) आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळणार आहे. ती गेल्या १ वर्षांपासून सरावापासून दूर आहे. गेल्या १ वर्षात तिने काहीच काही चमकदार कामगिरी देखील केलेली नाही.'

तसेच ती पुढे म्हणाली की, 'गेल्या वर्षी मी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं, असा कारनामा करणारी मी पहीलीच भारतीय कुस्तीपटू ठरली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत २०२३ स्पर्धेत मी रौप्य पदकाला गवसणी घातली होती. तर विनेशने अंस काहीच विशेष कामगिरी केली नाही. ती दुखापतग्रस्त देखील होती.' (Latest sports updates)

तिच्यात असं काय खास आहे?

याबाबत बोलताना ती पुढे म्हणाली की,'साक्षी मलिकने ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावले आहे. तरीदेखील तिला पाठवलं नाही. तिच्यात असं काय खास आहे? ट्रायल्स घ्या. फक्त मीच नव्हे तर असे अनेक खेळाडू आहेत जे तिला पराभूत करू शकतात'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com