Jemimah Rodrigues: गोड गळ्याची जेमिमा! सुमधुर आवाजात गायलेलं 'केसरीया' ऐकून प्रेमातच पडाल -VIDEO

Jemimah Rodrigues Singing Song: तिचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
Jemimah Rodrigues
Jemimah Rodriguesinstagram
Published On

Jemimah Rodrigues Viral Video: काही दिवसांपूर्वीच भारतात विमेन्स प्रीमिअर लीग स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत एकापेक्षा एक सामने पाहायला मिळाले होते. दरम्यान या संपूर्ण स्पर्धेत चर्चेत राहिली ती दिल्ली कॅपिटल्स संघाची युवा खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज.

फलंदाजी करताना तुफान फटकेबाजीमुळे चर्चेत असलेली जेमिमा क्षेत्ररक्षण करताना आपल्या क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत यायची. दरम्यान तिचे मैदानावर डान्स करतानाचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.

आता तिचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

Jemimah Rodrigues
Mark Boucher Reply: आधी IPL,नंतर WTC फायनल; गावसकरांनी रोहितला दिलेल्या विश्रांतीच्या सल्ल्यावर मार्क बाऊचरचे सणसणीत प्रत्युत्तर

जेमिमा रॉड्रिग्ज किती चांगला डान्स करू शकते, हे आपण विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धा सुरु असताना पाहिलं आहे. मात्र ती किती चांगलं गाणं गाऊ शकते हे तिचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला अंदाज येईलच. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जेमिमा गिटार घेऊन गाणं गाताना दिसून येत आहे.

Jemimah Rodrigues
IPL 1000th Match: IPL स्पर्धेत आज घडणार इतिहास! पाहा पहिल्या, १०० व्या अन् ५०० व्या सामन्याचा इतिहास

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती अरिजित सिंगचं गाजलेलं गाणं 'केसरीया तेरा..' गाताना दिसून येत आहे. हे गाणं गाताना तिने सूर ताल जराही इकडे तिकडे होऊ दिला नाहीये. या व्हिडिओला कॅप्शन देत तिने लिहिले की,' झोपेतून उठले , गिटार घेतला आणि माझे २ आवडते गाणे गायले. मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केला आहे.' हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

यापूर्वी देखील तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धा सुरु असताना ती लाईव्ह सामन्यात भांगडा करताना दिसून आली होती. तर एका सामन्यात ती सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना हिप हॉप डान्स करताना दिसून आली होती. हे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com