वडिलांच्या एका चुकीमुळे जेमिमा अडचणीत! Khar Gymkhana ची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

Jemimah Roderigues: जेमिमा रॉड्रिग्जच्या अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आता वडिलांनी केलेल्या चुकीमुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
वडिलांच्या एका चुकीमुळे जेमिमा अडचणीत! Khar Gymkhana ची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?
jemimah rodrigues twitter
Published On

आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला साखळी फेरीतून बाहेर पडावं लागलं. संघातील स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्जलाही हवी तशी कामगिरी करता आली नाही.

त्यामुळे तिच्या कामगिरीवरुन जोरदार टीका केली जात आहे. तिच्या अडचणी काही थांबायचं नाव घेत नाहीये. मुंबईतील सुप्रसिद्ध क्लब खार जिमखानामधून तिचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. काय आहे कारण? जाणून घ्या.

जेमिमाच्या वडिलांनी केलेल्या चुकीमुळे क्लब प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तिच्या वडिलांनी क्लब परिसराचा वापर हा धार्मिक कार्यक्रमांसाठी केला. यासह या कार्यक्रमांदरम्यान धर्मांतर केल्याचाही प्रकार घडल्याचा आरोप तिच्या वडिलांवर करण्यात आला आहे. याआधी क्लबच्या अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला होता. मात्र आता तिचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.

वडिलांच्या एका चुकीमुळे जेमिमा अडचणीत! Khar Gymkhana ची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?
IND vs NZ: टीम इंडियासाठी गुड न्यूज! दुसऱ्या कसोटीपूर्वी स्टार खेळाडू फिट

बैठकीत घेतला मोठा निर्णय

हा प्रकार उघडकीस येताच, खार जिमखानाच्या सदस्यांनी रविवारी वार्षिक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सदस्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. खार जिमखानाचे अध्यक्ष विवेक देवनानी यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ' जेमिमा रॉड्रिग्जला देण्यात आलेले सदस्यत्व २० ऑक्टोबर २०२४ रोजी रद्द करण्यात आले आहे.'

वडिलांच्या एका चुकीमुळे जेमिमा अडचणीत! Khar Gymkhana ची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?
IND vs NZ: रोहितच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड! जे विराट, धोनीच्या नेतृत्वात नाही घडलं, ते हिटमॅनच्या नेतृत्वात घडलं

तसेच खार जिमखानातील सदस्य शिव मल्होत्रा यांनी म्हटले की, ' आम्हाला समजलं की, जेमिमाचे वडील ब्रदर सॅम्युअल मिनिस्ट्रीज नावाच्या संघटनेसोबत मिळून काम करत होते. त्यांनी गेल्या दीड वर्षांपासून प्रेसिडेंशियल हॉल बुक केला होता. यादरम्यान ३५ कार्यक्रम आयोजित केले गेले. आता तिकडे काय होत असेल, हे आपण समजू शकतो. आपण संपूर्ण देशात धर्मांतराबद्दल ऐकतोय आणि आमच्या इथेच हे सुरु होतं.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com