IPL Video : रिषभ पंतच्या दिल्लीची खैर नाही! यॉर्कर किंग बुमराहचा व्हिडिओ बघून सगळेच गपगार!

Jasprit Bumrah Viral Video : जसप्रीत बुमराहचा नेटमध्ये सराव करतानाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
jasprit bumrah net practice
jasprit bumrah net practice SAAM TV

कच्चून गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना क्रिझमध्येच लोळवणाऱ्या जसप्रीत बुमराहचा नेटमध्ये सराव करतानाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओ गोलंदाजीचा नाही, तर एकावर एक षटकार ठोकण्याचा सराव करतानाचा आहे. हा व्हिडिओ बघून आगामी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचं काही खरं नाही, असंच म्हणावं लागेल.

आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होत आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. त्याआधीच मुंबईचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेटमध्ये तो गोलंदाजी नाही, तर फलंदाजीचा सराव करत आहे.

फलंदाजी करताना तो षटकार ठोकताना दिसतोय. फलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ बघून सगळेच हैराण झाले आहेत. बुमराहने आतापर्यंतच्या आठ सामन्यांत एकूण ३२ षटके टाकली आहेत. त्याने ६.३७ सरासरीने धावा देतानाच, १३ विकेट घेतल्या आहेत. सध्या पर्पल कॅप त्याच्याकडेच आहे. बुमराह गोलंदाजीत कमाल करत आहेच, पण आता फलंदाजीतही धम्माल करण्याचा त्याचा इरादा आहे, असं या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसतं.

jasprit bumrah net practice
RCB Won Against SR: होम ग्राउंडवर हैदराबादचं सपशेल लोटांगण; बेंगळुरूला तब्बल १ महिन्यानंतर विजयाचा सूर गवसला

फलंदाजीतही चुणूक दाखवलीये

जसप्रीत बुमराहला फलंदाजी करताना खूप कमी वेळा बघितले आहे. पण यॉर्कर स्पेशालिस्ट असलेल्या बुमराहमध्ये फलंदाजी करण्याचीही क्षमता आहे. अनेकदा फलंदाजीतही त्यानं चुणूक दाखवलेली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रमही बुमराहच्या नावावर आहे. बुमराहने २०२२ मध्ये बर्मिंघम कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात चार चौकार आणि दोन षटकार ठोकले आहेत. बुमराहने एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला होता.

jasprit bumrah net practice
कितीही करा चर्चा, हवा तर रिषभ पंतचीच! T20 वर्ल्डकपसाठी 'परफेक्ट', पण आणखी दोघे शर्यतीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com