Ishan Kishan : ईशान किशननं टीम इंडियाची दारं उघडली, स्फोटक शतकी खेळीचा VIDEO बघा

Ishan Kishan century VIdeo : टीम इंडियात संधी न मिळालेल्या ईशान किशन याने स्थानिक क्रिकेटमध्ये तुफान शतकी खेळी करून कमबॅकचे संकेत दिले आहेत.
Ishan Kishan News | ईशान किशन याने स्थानिक क्रिकेटमध्ये शतक झळकावून टीम इंडियात कमबॅक करण्याचे संकेत दिले.
Ishan Kishan News | ईशान किशन याने स्थानिक क्रिकेटमध्ये शतक झळकावून टीम इंडियात कमबॅक करण्याचे संकेत दिले.Social media
Published On

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून सध्या दूर असलेल्या ईशान किशन यानं स्थानिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला. स्फोटक शतकी खेळीनं कमबॅक करून त्यानं बंद झालेली टीम इंडियाची दारं उघडण्याचे संकेत दिले आहेत.

मध्य प्रदेश विरूद्धच्या सामन्यात झारखंड संघाचा कर्णधार असलेल्या ईशान किशनची बॅट चांगलीच तळपली. त्यानं नैसर्गिक खेळी करत तडाखेबंद शतक ठोकलं. तो ११४ धावा करून बाद झाला. त्यानं हे शतक अवघ्या ८६ चेंडूंमध्ये पूर्ण केलं.

षटकारानं शतक पूर्ण

विशेष म्हणजे ईशान यानं हे शतक उत्तुंग षटकार ठोकून पूर्ण केलं. बऱ्याच काळानंतर झारखंडसाठी खेळणाऱ्या ईशाननं या स्फोटक खेळीतून टीम इंडियातील परतीची दारं उघडण्याचे संकेत दिले आहेत. आता तो प्रबळ दावेदार मानला जात आहे.

देशांतर्गत क्रिकेट न खेळणं अंगलट

देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळणं ईशान किशनच्या अंगलट आलं होतं. या कारणामुळं त्याला टीम इंडियातून बाहेर पडावं लागलं होतं. याशिवाय त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टही गमवावा लागला होता. मात्र, यातून तो चांगलाच धडा शिकला असून, त्यानं झारखंडसाठी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे टीम इंडियात कमबॅक करणं ईशानसाठी सहजसोपं नसेल. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याला कामगिरीमध्ये सातत्य ठेवावं लागणार आहे.

त्यावेळी ईशाननं ऐकलं नाही!

ईशान किशन गेल्या वर्षीच्या अखेरीस टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. तो जबरदस्त फॉर्मात होता. पण तरीही त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळू शकली नाही. त्यावेळी त्यानं मध्यंतरीच तो क्रिकेटमधून ब्रेक घ्यायचाय असं सांगून मायदेशी परतला होता. त्यावेळी माजी प्रशिक्षक राहुल द्रविडनं त्याला रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याचा सल्ला दिला होता. पण तो स्थानिक क्रिकेटमध्ये खेळला नव्हता.

Ishan Kishan News | ईशान किशन याने स्थानिक क्रिकेटमध्ये शतक झळकावून टीम इंडियात कमबॅक करण्याचे संकेत दिले.
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह रचणार इतिहास! पहिल्याच सामन्यात ४०० चा आकडा गाठण्याची संधी

सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही हटवलं

भारतात परतल्यानंतर ईशान किशन हा हार्दिक पंड्यासोबत आयपीएलच्या तयारीला लागला होता. त्यावेळी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा राहुल द्रविडनं दिलेला सल्ला त्यानं ऐकला नसल्याचे समोर आल्याचे वृत्त होते. त्यानंतर वाद चिघळला आणि टी २० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियात त्याला स्थान दिलं नाही. तसेच सेंट्रल कॉन्ट्रॅक्टही गमवावा लागला.

ईशाननं अनेकदा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण देशांतर्गत क्रिकेट न खेळणाऱ्यांना टीम इंडियात स्थान मिळणार नाही, अशी भूमिका त्यावेळी बीसीसीआयने घेतल्याचे सांगण्यात येत होते. आता ईशाननं बुची बाबू टूर्नामेंटमध्ये झारखंडकडून खेळण्याचा निर्णय घेतला असून, टीम इंडियातील परतीची दारं उघडल्याचं मानलं जात आहे.

Ishan Kishan News | ईशान किशन याने स्थानिक क्रिकेटमध्ये शतक झळकावून टीम इंडियात कमबॅक करण्याचे संकेत दिले.
IPL 2025: MS धोनीसाठी कायपण! बीसीसीआय आयपीएलमध्ये नवा नियम आणण्याची शक्यता; चेन्नईच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com