IPL मध्ये पदार्पण करणारा सत्यनारायण राजू कोण आहे? चेन्नईविरुद्ध MI कडून खेळला पहिला सामना

Who Is Satyanarayana Raju : मुंबई इंडियन्सने IPL 2025 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या प्लेइंग 11 मध्ये सत्यनारायण राजूचा समावेश केला. हा सामना त्याचा आयपीएल पदार्पणाचा सामना आहे.
 IPL 2025
Who Is Satyanarayana Raju
Published On

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या IPL २०२५च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सत्यनारायण राजूचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला. हा त्याचा आयपीएलमधील पदार्पण सामना आहे. आंध्र प्रीमियर लीग २०२४ मध्ये त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच कारणामुळे मुंबईच्या फलटणमध्ये त्याचा समावेश करण्यात आलाय. आयपीएल २०२५साठी त्याला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना खरेदी केलंय.

सत्यनारायण राजू आंध्र प्रीमियर लीग २०२४ मध्ये शानदार प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. सत्यनारायण राजू हा डाव्या हाताने गोलंदाजी करतो. त्याने ७ सामन्यांमध्ये ६.१५च्या इकॉनमीने ८ विकेट घेतल्या होता. यामुळे त्याच्या संघाने रॉयल सीमा किंग्स ट्रॉफी जिंकली होती.

सत्यनारायण राजूचा जन्म १० जुलै १९९९ ला झालाय. सत्यनारायण राजूचं पूर्ण नाव पेनुमतसा व्यंकटा सत्यनारायण राजू आहे. तो डाव्या हाताने मध्यम गतीने गोलंदाजी करतो. तो आंध्र प्रीमियर लीगमध्ये रायलसीमा किंग्ज संघाकडून खेळला. आंध्राकडून खेळताना सत्यनारायण राजूने रणजी ट्रॉफीमध्ये राजस्थानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात एकूण ३ बळी घेतले होते.सत्यनारायणने खेळलेल्या टी२० सामन्यात त्याने ८.२३ च्या इकॉनॉमीसह ७ विकेट घेतल्यात. त्याने ८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३.५८ च्या इकॉनॉमीने १७ विकेट घेतल्या आहेत. त्याने ७ लिस्ट ए सामन्यात ९ विकेट घेतल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा त्याच्या आयपीएल करिअरचा हा पहिला सामना आहे. आयपीएल सीजन १८ मधील हा तिसरा सामना आहे. हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे या सामन्यात सूर्यकुमार यादव कर्णधारपद भूषवत आहे.

मुंबईच्या संघाची फलंदाजी ढेपाळली

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स सामना होत आहे. टॉस जिंकत चेन्नईने मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. मुंबईच्या संघाने चेन्नईपुढे गुडघे टेकले. फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली. रोहित शर्मा पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. रोहितला खलील अहमदने बाद केले. मुंबईच्या एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com