
आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाने जबरदस्त कामगिरी केलीय. या संघाने दोन सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. आरसीबीचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी आहे. परंतु पॉइंट्स टेबलवर अव्वलस्थानी राहण्यावरून भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवानने आरसीबीला ट्रोल केलं. आरसीबीचा संघ आघाडीवर असणं सेहवागलाही आवडलं नसल्याचं दिसतंय.
सेहवागने आरसीबीबाबत केलेलं विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान वीरेंद्र सेहवागने केलेलं विधान आरसीबीच्या चाहत्यांना आवडलं नाहीये. सेहवागच्या विधानावर आरसीबीचे चाहते सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान आरसीबीचा संघ आजपर्यंत आयपीएलची ट्रॉफी जिंकू शकला नाहीये. परंतु यंदाच्या १८ व्या हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्त्वात आरसीबीनं दोन सामने जिंकले आहेत.
तरीही वीरेंद्र सेहवानने आरसीबीची खिल्ली उडवलीय. क्रिकबज वृत्तसंस्थेच्या एका कार्यक्रमात बोलताना सेहवागने रॉयल चॅलेंजर्स बेंगरुळू संघाची खिल्ली उडवली. सेहवानगच्या विधानावरून चाहते नाराज झाले आहेत. गरिबांनाही वरती राहू द्या. फोटो घेऊ द्या काही वेळ. माहिती नाही ते किती वेळ गरीब लोक पॉइंट टेबलच्या अव्वलस्थानी राहतात,असं विधान वीरेंद्र सेहवाननं केलंय.
पुढे बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, मी पैशांबाबत बोलत नाहीये. ते सर्वजण पैशाने श्रीमंत आहेत. फ्रेंचायजी प्रत्येक सीझनमध्ये ४०० ते ५०० कोटी रुपये कमावत आहे. त्यामुळे मी याबाबत बोलत नाहीये. मी त्याबद्दल बोलत नाहीये. पण त्यांनी एकही ट्रॉफी जिंकली नाहीये. म्हणून मी त्यांना गरीब म्हणतो. मात्र सेहवागच्या या वक्तव्यानंतर चाहते संतापले आहेत. त्यानंतर चाहत्यांनीही सेहवागच्या या व्हिडिओवर कमेंट करायला सुरुवात केलीय.
आयपीएलची सुरुवात २००८ पासून झाली. तेव्हापासून आरसीबीने ३ वेळा आयपीएलची फायनल गाठलीय. पण आजपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला ट्रॉफी जिंकता आलेली नाहीये. त्यामुळे संघाला अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते, मात्र यावेळी आरसीबी जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जातोय. प्रत्येक मोसमात आरसीबीची कमकुवत बाजू त्यांची गोलंदाजी मानली जात होती, मात्र यावेळी संघाची गोलंदाजी खूपच मजबूत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.