Virat Kohli KL Rahul : बरं झालं आउट झालास नाहीतर...; भरमैदानात विराट कोहली केएल राहुलला असं का म्हणाला? पाहा व्हिडिओ

IPL 2025 Virat Kohli KL Rahul : दिल्ली विरुद्ध बंगळुरू या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यामध्ये वाद झाला होता. तेव्हा दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता दिल्लीने शेअर केलेल्या आणखी एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
Virat Kohli KL Rahul
Virat Kohli KL Rahul X
Published On

IPL 2025 मध्ये रविवारी (२७ एप्रिल) दिल्ली आणि बंगळुरू हे संघ आमने-सामने आले. दिल्लीने दिलेले १६२ धावांचे लक्ष गाठताना बंगळुरूची फलंदाजी सुरु होती, त्यावेळेस काही शुल्लक कारणांवरुन विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यात राडा झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सामना संपल्यानंतर विराट आणि राहुल सर्वकाही विसरुन पुन्हा एकत्र आले.

सामना संपल्यानंतर विराट-राहुल एकत्र हसताना-गप्पा मारताना दिसले. विराट तेव्हा केएल राहुलला मस्करीमध्ये चिडवत असल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्यामध्ये काय संवाद झाला याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सामन्यानंतरचा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सच्या सोशल मीडिया अकांउट्सवर शेअर करण्यात आला आहे.

Virat Kohli KL Rahul
KL Rahul Sanjiv Goenka : केएल राहुल-संजीव गोएंका यांच्यात काय घडलं? एका वर्षानंतर वादावरचा पडदा सरकला; खेळाडूनंच...

व्हिडीओमध्ये विराट आणि राहुल मिठी मारल्याचे पाहायला मिळते. राहुल विराटला उद्देशून हसत म्हणाला, बरं झालं तू बाद झालास... त्यावर विराटही हसला. तुला माहितीये मी काय विचार करत होतो? मी सामना संपवून हे (कंतारा सेलिब्रेशन) करेन आणि तुझ्याजवळ येऊन तुला मिठी मारेन. या लोकांना खरंच माहीत नाही, आपण मैदानाबाहेर कसे आहोत, असे विराटने म्हटले. त्यासोबतच विराटने राहुलच्या कंतारा सेलिब्रेशनची कॉपी देखील केली.

Virat Kohli KL Rahul
१४ वर्षाच्या वैभवची कमाल; धुरंदर गोलंदाजांना नमवलं, शानदार शतक झळकावलं, 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

१० एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिट्स हा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला होता. या सामन्यात दिल्लीकडून खेळताना ५३ बॉल्सवर ९३ धावा केल्या होत्या. सामना दिल्लीला जिंकवून दिल्यानंतर हे माझं घर आहे.., हे माझं मैदान आहे असे कंतारा स्ट्राईल सेलिब्रेशन केएल राहुलने केले होते. हे सेलिब्रेशन रविवारच्या सामन्यात विराट करेल अशी चाहत्यांना आशा होती. पण सामना संपण्यापूर्वी विराट ५१ धावांवर बाद झाला.

Virat Kohli KL Rahul
Shahid Afridi : भारताविरुद्ध गरळ ओकली, तरीही सरकारने शाहिद आफ्रिदीच्या यूट्यूब चॅनलवर बंदी का नाही घातली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com