IPL Auction, Priyansh Arya: 6 चेंडूत 6 षटकार मारणारा प्रियांश झाला करोडपती! 30 लाख बेस प्राईज अन् लागली 3.80 कोटींची बोली

Priyansh Arya IPL 2025 Mega Auction: दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या प्रियांश आर्यावर मोठी बोली लागली आहे.
IPL Auction, Priyansh Arya: 6 चेंडूत 6 षटकार मारणारा प्रियांश झाला करोडपती! 30 लाख बेस प्राईज अन् लागली 3.80 कोटींची बोली
priyansh aryasaam tv
Published On

Priyansh Arya News In Marathi: दिल्ली प्रिमियर लीग स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या युवा खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणजे, प्रियांश आर्या. २३ वर्षीय प्रियांश आर्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिल्लीसाठी खेळतो.

मात्र आगामी हंगामात तो पंजाब किंग्जकडून खेळताना दिसून येणार आहे. या लिलावात पंजाबने त्याला ३.८० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

ज्यावेळी प्रियांश आर्या लिलावात आला, त्यावेळी जवळजवळ सर्वच फ्रेंचायझींचे पैसे संपायला आले होते. मात्र या खेळाडूचं नाव येताच, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्जमध्ये स्पर्धा सुरु झाली.

दोघांनीही या खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावला. या २३ वर्षीय खेळाडूमध्ये असं काय खास आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर याच खेळाडूने दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत वादळ आणलं होतं.

IPL Auction, Priyansh Arya: 6 चेंडूत 6 षटकार मारणारा प्रियांश झाला करोडपती! 30 लाख बेस प्राईज अन् लागली 3.80 कोटींची बोली
Ind vs Aus: पर्थचा कौल अखेर भारताच्याच बाजूने; टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव

त्याने सलग ६ चेंडूत ६ षटकार मारले होते. या सामन्यात फलंदाजी करताना आयुष बदोनीने १६५ धावा, तर प्रियांश आर्याने नाबाद १२० धावांची वादळी खेळी केली होती. या वादळी खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या २० षटकअखेर ३०८ धावांवर पोहोचवली होती. या खेळीदरम्यान त्याने १२ लाख मोजले होते.

IPL Auction, Priyansh Arya: 6 चेंडूत 6 षटकार मारणारा प्रियांश झाला करोडपती! 30 लाख बेस प्राईज अन् लागली 3.80 कोटींची बोली
IPL 2025 Mega Auction: मुंबईकर रिकाम्या हातीच परतले! रहाणेसह 2 स्टार खेळाडू अन्सोल्ड

३० लाख ते ३.८० लाख

प्रियांश आर्याची बेस प्राईझ ३० लाख रुपये होती. ज्यावेळी तो लिलावात आला त्यावेळी पंजाब आणि बंगळुरुमध्ये त्याला आपल्या संघात घेण्यासाठी चांगलीच स्पर्धा रंगली. बोली वाढत वाढत ३.८० कोटींपर्यंत जाऊन पोहोचली. शेवटी पंजाबने त्याला ३.७० कोटींची बोली लावत आपल्या संघात घेतलं.

प्रियांशच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ६९ धावा केल्या आहेत. तर ११ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ३५६ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com