IPL 2025: मुंबई इंडियन्स होणार टॉपर, जाणून घ्या Points Tableचं समीकरण

IPL 2025 Playoff Scenario : पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स सध्या चौथ्या स्थानावर आहे. मुंबईच्या संघाकडे 16 पॉईंट्स आहेत. पण मुंबईच्या संघाला टॉपर होण्याची संधी आहे.
IPL 2025
IPL 2025 Playoff Scenario saam tv
Published On

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. या विजयासह मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये १६ पॉईट्ससह चौथ्या स्थानावर आहे. त्यात मुंबईच्या संघाचा एक सामना बाकी आहे. मुंबई संघाचा हा सामना पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यात मुंबईकडे टॉपर होण्याची संधी आहे. पंजाबला पराभूत करत मुंबईच्या संघाकडे पॉईट्स टेबलवर टॉपर होण्याची संधी आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये सध्या नंबर 1 वर गुजरात टायटन्स असून त्यांच्याकडे 18 पॉईंट्स आहेत , तर दुसऱ्या नंबरवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू असून त्यांच्याकडे 17 पॉई्ट्स आहेत. त्यानंतर पंजाब किंग्स 17 पॉई्ट्ससह तिसऱ्या स्थानी आहे. तर चौथ्या क्रमांकावर 16 पॉईंट्स सह मुंबई इंडियन्स आहे. टॉप 3 मधील संघांचे एकूण 2 सामने शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्सचा फक्त एक सामना शिल्लक आहे. मुंबई इंडियन्सकडून आयपीएलच्या पॉई्ट्स टेबलमध्ये टॉपवर राहून लीग स्टेज फिनिश करणं हे कठीण आहे परंतु अशक्य नाहीये.

टॉपवर राहून फिनिश करण्याची संधी

मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सविरुद्ध 26 मे रोजी सामना खेळायचा आहे. हा सामना त्यांना काहीही करून जिंकावा लागेल. मुंबई इंडियन्सचे 18 पॉईंट्स होतील. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स यांना लीग स्टेजमधील उरलेले सर्व सामना हरावे लागतील. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचे शेवटी 18-18 पॉईंट्स होतील. तर आरसीबी आणि पंजाब किंग्सचे 17-17 पॉईंट्स होतील. तर 18 पॉईंट्स आणि चांगल्या नेट रनरेटच्या आधारावर मुंबई इंडियन्सचा संघ टॉपवर जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com