IPL 2025 MI: हिटमॅन रोहित शर्माची मुंबई इंडियन्समधून हकालपट्टी होणार? 'हे' ३ खेळाडू घेऊ शकतात जागा

Rohit Sharma : चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पुढील सामन्यात रोहितने निराशा केली आणि त्याला केवळ 8 धावा करता आल्या.
IPL 2025
Rohit Sharma
Published On

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा मोठा बोलबाला आहे. मात्र २०२५ चं सीझन मुंबईसाठी खराब राहिलंय. सुरुवातीच्या दोन सामन्यात मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव झाला. केकेआरविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यात मुंबईला विजय गवसला. मुंबईने वानखेडे मैदानात विजयाचं खातं उघडलं. पण मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा मात्र या तिन्ही सामन्यात चांगली फलंदाजी करण्यात अपयशी ठरलाय.

आयपीएलमध्ये रोहित शर्मा वारंवार अपयशी ठरत आहे. त्यामुळे रोहित शर्मा पुढे मुंबईचा भाग राहणार नाही अशी चर्चा सुरू झालीय. वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा मोठी खेळी करेल, असं वाटत होतं पण रोहित १३ धावा करू शकला. आयपीएलमधील रोहित शर्माच्या फलंदाजीवर गेल्या काही सत्रांपासून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कर्णधारपद सोडल्यानंतर तो मोठी खेळी करू शकला नाहीये. त्यामुळे रोहित शर्मा मुंबई संघाचा भाग राहणार नसल्याचं म्हटलं जातं.

IPL 2025
Cricket News: ईशान किशन BCCIच्या करारातून Out होणार? 'या' तीन खेळाडूंची होणार एंट्री

रोहित शर्माची कामगिरी

आयपीएल २०२५ मध्ये रोहित मोठी खेळी करू शकला नाहीये. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पुढील सामन्यात रोहितने निराशा केली आणि त्याला केवळ ८ धावा करता आल्या. केकेआरने मुंबईसमोर केवळ ११७ धावांचे आव्हान ठेवले होते. रोहितकडे स्वत:ला सेटल करण्यासाठी भरपूर वेळ होता. मात्र रोहित केवळ १३ धावा करू शकला.

IPL 2025
IPL 2025: गरिबांनाही वरती राहू द्या! वीरेंद्र सेहवागने उडवली RCBची खिल्ली

MI मध्ये बदल करण्याची वेळ आलीय का?

आयपीएलमध्ये आता संघ आक्रमकपणे खेळणाऱ्या अशा फलंदाजांना प्राधान्य दिलं जात आहे. प्रत्येक संघ आपल्या शीर्ष फळीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत असतो. मात्र रोहितच्या सततच्या अपयशामुळे मुंबई इंडियन्ससमोर अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंबई संघाने बदलाचा विचार केला तर रोहितची जागा कोण घेणार हे पाहावं लागेल.

रोहितची जागा कोण घेणार?

या यादीत विल जॅकचे नाव येऊ शकते. एमआयच्या टॉप ऑर्डरच्या समस्यांवर तो पर्याय ठरू शकतो. मजबूत सुरुवात करण्याची त्याची क्षमता आणि आयपीएल २०२४ मध्ये त्याचा १७५चा स्ट्राइक रेट होता त्यामुळे तो एमआयसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्याचबरोबर मुंबई संघ जॅकला सलामीवीर बनवण्याबरोबरच कॉर्बिन बॉशलाही संधी देऊ शकतो. बॉशने अद्याप आयपीएलमध्ये एकही सामना खेळलेला नाहीये.

IPL 2025
LSG vs PBKS, IPL 2025: आयपीएलच्या १३ व्या सामन्यात पाऊस पडेल? जाणून घ्या लखनौचा हवामान आणि एकाना स्टेडियमचा Pitch रिपोर्ट

पण इतर लीगमध्ये त्याची अष्टपैलू कामगिरी अप्रतिम राहिली आहे. दुसरे नाव कृष्णन सृजितचे असू शकते, तो विकेटकीपर आक्रमक फलंदाज आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये श्रीजीतचा कर्नाटकसाठी उत्कृष्ट विक्रम आहे. २०२४ च्या महाराजा ट्रॉफीमध्ये ५१ चेंडूत शानदार शतक झळकावून त्याने ठळकपणे चर्चा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com