
IPL 2025 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये रंगणार आहे. दोन्ही संघांनी आयपीएलच्या इतिहासात एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. येत्या काही तासांमध्येच नवा चॅम्पियन मिळणार आहे. बंगळुरू आणि पंजाब हे दोन्ही संघ विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
फायनलदरम्यानचे हवामान -
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२५ चा अंतिम सामना रंगत असताना संध्याकाळी हवामान उबदार आणि किंचित दमट स्वरुपाचे असेल. तापमान २९ ते ३० डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल. काही काळासाठी ढगाळ वातावरण राहील. पाऊस पडण्याची शक्यता ५ टक्के आहे, थोड्यासा रिमझिप पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आर्द्रता ५८ टक्यांपर्यंत वाढेल, यामुळे दवबिंदू २२ डिग्री सेल्सियसपर्यंत जाईल. ही स्थिती चेज करणाऱ्यासाठी अनुकूल राहिले.
फायनलदरम्यानची खेळपट्टी -
नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजीसाठी योग्य राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. पिचवर गवताचे आच्छादन आहे तसेच सुरुवातीला ओलावा देखील आहे. परंतु तीव्र उष्णतेमुळे ते लवकर कोरडे होण्याची शक्यता आहे. चेंडू बॅटवर जाईल, त्यामुळे संपूर्ण डावात स्ट्रोक प्लेला अनुकूल ठरेल. गोलंदाजांनी हुशारीने खेळ करण्याची गरज आहे. लेन्थ बदलू शकणाऱ्यांना गोलंदाजीत मदत मिळेल असे म्हटले जात आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स हेड टू हेड रेकॉर्ड -
एकूण सामने - ३६
बंगळुरुने जिंकलेले सामने - १८
पंजाबने जिंकलेले सामने - १८
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संभाव्य प्लेईंग ११ -
विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड, सुयश शर्मा
इम्पॅक्ट प्लेयर : मयंक अगरवाल
पंजाब किंग्सची संभाव्य प्लेईंग ११ -
प्रियांश आर्य, जोश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वधेरा, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंह, अझमतुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेयर : हरप्रीत ब्रार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.