IPL 2024 Update: प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी आणि कुठे होईल अंतिम सामना

IPL 2024 Playoffs Schedule: आयपीएलच्या प्लेऑफचे सामने कुठे होणार या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. १७ व्या हंगामातील ५ आयपीएल सामने झालेत.
IPL 2024 Playoffs Schedule:
IPL 2024 Playoffs Schedule:Saam Tv

IPL 2024 Playoffs Schedule Update:

सध्या भारतात आयपीएलचे सामने खेळले जात आहेत. लीगच्या १७ व्या मोसमात आतापर्यंत ५ सामने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलचा अंतिम सामना कधी होणार याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलीय. दरम्यान देशात यंदा लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत,यामुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.हे १७ दिवसांचे वेळापत्रक होतं. यात ४ डबल हेडर सामन्यासह एकूण २१ सामने होणार आहेत. (Latest News)

Cricbuzz च्या अहवालानुसार IPL २०२४ चा पहिला क्वालिफायर सामना २१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तर या हंगामातील एलिमिनेटर सामना २२ मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. दुसरा क्वालिफायर सामना २४ मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. तर अंतिम सामना २६ मे रोजी चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर होणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर चेपॉकमध्ये आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. यापूर्वी २०१२ मध्ये चेन्नईत आयपीएलची फायनल झाली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आयपीएल २०२४: प्लेऑफ वेळापत्रक

  • क्वालिफायर सामना १ – अहमदाबाद, २१ मे

  • एलिमिनेटर – अहमदाबाद, २२ मे

  • क्वालिफायर सामना २ - चेन्नई, २४ मे.

  • अंतिम सामना - चेन्नई, २६ मे

आयपीएलचा दुसरा टप्पा ८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. निवडणुकीच्या तारखा डोळ्यासमोर ठेवून पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक आधी जाहीर करण्यात आले. आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशात १९ एप्रिल ते १ जून दरम्यान ७ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. दुसरा टप्पा ८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. हा सामना चेपॉक येथे संध्याकाळी साडेसात वाजता होईल.

रिपोर्टनुसार पंजाब किंग्सचे काही सामने धरमशाला येथे खेळवले जातील. पंजाब किंग्सचा सामना ५ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि ९ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. राजस्थान रॉयल्सचे २ सामने गुवाहाटी येथे होणार आहेत. १५ मे रोजी राजस्थानचा सामना पंजाब किंग्सशी होईल. तर १९ मे रोजी कोलकाता नाइट रायडर्सचा गुवाहाटीशी सामना होईल.

IPL 2024 Playoffs Schedule:
RCB vs PBKS IPL 2024: आज पंजाब आणि बेंगळुरूमध्ये सामना; घरच्या मैदानात RCB मारणार बाजी? जाणून दोन्ही संघातील प्लेइंग ११

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com