IPL2024 मधील जसप्रीतचा सर्वोत्तम Yorker; दांडी गूल करत बुमराहने रोखली पृथ्वीच्या धावांची गाडी

IPL 2024 MI Vs DC : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात अखेर मुंबई इंडियन्स संघाला विजयाचा सूर गवसला आहे. हा सामना मुंबईने २९ धावांनी जिंकला आहे. हा मुंबईचा या हंगामातील पहिलाच विजय ठरला.
jasprit bumrah yoker ball
jasprit bumrah yoker ball x IpL

Mumbai Indians vs Delhi Capitals Jasprit Bumrah Yoker :

यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील २० वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स झाला. यात मुंबई इंडियन्सने पहिला विजय मिळवला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने २९ धावांनी विजय मिळवत दिल्लीला पराभूत केलं. मुंबई इंडियन्स संघाने या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला विजयासाठी २३५ धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईच्या फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोख बचावली.(Latest News)

सलामीला आलेल्या डेव्हिड वॉर्नरला स्वस्त माघारी पाठवल्यानंतर दिल्लीचे फलंदाज पृथ्वी शॉ आणि अभिषेक पोरेल यांनी डाव सावरत मुंबंईच्या संघाला चिंतेत टाकलं. पृथ्वी शॉने ४० चेंडूत ६६ धावा केल्या यात ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. या दोघांची खेळी पाहून दिल्लीचा विजय पक्का वाटत होता. परंतु एमआयचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह याने दिल्लीच्या विजयी स्वप्नांना सुरूंग लावला.

बुमराहने पृथ्वीच्या दांड्या गूल करत दिल्लीला विजयापासून दूर नेलं. जसप्रीत बुमराहने आयपीएल २०२४ मधील सर्वोत्तम यॉर्करपैकी एक टाकून पृथ्वीचा दांडा उडवत सामना फिरवला. बुमराहच्या या यॉकर चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शेफर्डने पहिल्याच षटकात दिल्लीला धक्का देत डेव्हिड वॉर्नरला स्वस्तात माघारी पाठवले. त्यानंतर पृथ्वीने आणि पोरेलने डाव सावरला.

पृथ्वीने ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दिल्लीने १० षटकांत १ बाद ९४ धावा उभ्या केल्या होत्या. त्यांना शेवटच्या १० षटकांत १४१ धावा करायच्या होत्या. पोरेल आणि पृथ्वीची धावांची भागीदारी पाहून ते दोघेही दिल्लीला विजय मिळवून देतील असं वाटत होतं. या दोघांनी ८८ ( ४९) धावांची भागीदारी केली. या भागीदारीला जसप्रीत बुमराहने तोडलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान मुबंईकडून फलंदाजी करताना रोहित शर्माने ( ४९) व इशान किशन ( ४२) यांना अक्षर पटलेने बाद केलं. कर्णधार हार्दिक पांड्या ( ३९) व डेव्हिडने ६० धावांची भागीदारी करून दिल्लीला आव्हान दिले. त्यानंतर रोमारियो शेफर्डने शेवटच्या षटकात ४,६,६,६,४,६ अशा ३२ धावा कुटल्या. मुंबईने शेवटच्या ४ षटकांत ८४ धावा चोपल्या आणि ५ बाद २३४ धावा केल्या. डेव्हिडने २१ चेंडूंत २ चौकार ४ षटकारांसह नाबाद ४५ धावा केल्या. तर शेफर्डने १० चेंडूंत ३९ धावांची नाबाद खेळी केली. मुंबईच्या या फलंदाजाची फटकेबाजी दिल्लीच्या खेळाडूंसह चाहत्याच्या आठवणीत राहिली.

jasprit bumrah yoker ball
IPL VIDEO : 2 यॉर्कर, 2 क्लीन बोल्ड; चेन्नईच्या पथिरानाची 150 च्या बुलेट स्पीडनं धडकी भरवणारी गोलंदाजी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com