IPL 2024 GT vs SRH : फिरकीपटूंसमोर हैदराबादची फलंदाजी ढेर, गुजरातसमोर १६३ धावांचे लक्ष्य

IPL 2024 GT vs SRH : गुजरात आणि हैदराबाद या दोन्ही संघांचा यंदाच्या मोसमातील हा तिसरा सामना आहे. यापूर्वी झालेल्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी एक सामना जिंकला आणि एक सामना गमावलाय.
IPL 2024 GT vs SRH
IPL 2024 GT vs SRH

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad :

आयपीएल २०२४ च्या १२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना सनराइजर्स हैदराबादशी होत आहे. हा सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात हैदराबादची फंलदाजी नाकामी ठरलीय. गुजरात संघासमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.(Latest News)

प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला ट्रॅव्हिस हेड आणि मयंक अग्रवाल यांनी वेगवान सुरुवात केली. परंतु ते जास्त वेळ खेळू करू शकले नाहीत. आजमतुल्‍लाह ओमारजईने अग्रवालला १६ धावात झेलबाद केलं. तर ट्रॅव्हिस हेडला १९ धांवांमध्ये नूर अहमदने क्लीन बोल्ड करत बाद केलं. येथून गुजरातच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केलं.

हैदराबादच्या फलंदाजांना मोठी धावासंख्या उभारू दिले नाही. यानंतर अभिषेक शर्मादेखील गुजरातच्या फिरकीसमोर टिकू शकला नाही. शर्मा अवघ्या २९ धावांमध्ये बाद झाला. त्यानंतर हेन्रिक क्लासेनला राशिद खानने त्याला २४ धावांवर क्लीन बोल्ड केले. एडन मार्कराम देखील अवघ्या १७ धावा करत तंबूत परतला. हैदराबाद संघाला जेव्हा मोठ्या खेळीची गरज होती त्यावळी अब्दुल समद (२९) आणि शाहबाज अहमद (२२) धावा करत सनरायझर्स हैदराबादला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले.

परंतु मोहित शर्माने शेवटच्या षटकात सलग दोन चेंडूंत शाहबाज अहमद आणि वॉशिंग्टन सुंदरला बाद केले. मोहितने आपल्या शेवटच्या षटकात फक्त ३ धावा दिल्या. अशाप्रकारे हैदराबाद संघाला २० षटकात ८ गडी गमावून १६२ धावा करता आल्या. गुजरात टायटन्सकडून मोहित शर्माने सर्वाधिक ३ बळी घेतले. अजमतुल्ला उमरझाई, उमेश यादव, नूर अहमद आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

गुजरात टायटन्स प्लेइंग ११:

रिद्धिमान साहा, शुभमन गिल (कर्णधार), उमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा, दर्शन नळकांडे.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ११:

ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि जयदेव उनाडकट.

IPL 2024 GT vs SRH
IPL 2024 : आंद्रे रसलने आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास, काय आहे 'हा' विक्रम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com