Mayank Yadav: 'हा शोएब अख्तरचा रेकॉर्ड मोडणार..', मयांकच्या भन्नाट गोलंदाजीनंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

Social Media Reactions On Mayank Yadav: मयांक यादवने पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात ताशी १५५.८ च्या गतीने चेंडू टाकला. या शानदार कामगिरीनंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.
will break shoaib akhtar record social media reactions on mayank yadav bowling
will break shoaib akhtar record social media reactions on mayank yadav bowling twitter
Published On

Social Media Reactions On Mayank Yadav Bowling:

लखनऊ सुपर जायंट्स संघाचा युवा गोलंदाज मयांक यादव सध्या तुफान चर्चेत आहे. या गोलंदाजाने पहिल्याच सामन्यात आपल्या भन्नाट गतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. शनिवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

हा मयांक यादवचा आयपीएल कारकिर्दीतील पहिलाच सामना होता. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने भन्नाट गतीने गोलंदाजी करताना ताशी १५५.८ गतीने चेंडू टाकला. त्याची ही भन्नाट गोलंदाजी पाहून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याचं कौतुक केलं आहे.

या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ विजयाच्या दिशेने आगेकुच करत होता. त्यावेळी मयांक यादवने आपल्या भन्नाट गतीच्या बळावर जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्माला बाद करत माघारी धाडलं. इथूनच लखनऊ सुपरजायंट्स संघाने कमबॅक केलं आणि संघाला विजयही मिळवून दिला. या डावात गोलंदाजी करताना त्याने ४ षटकात २७ धावा खर्च करत ३ फलंदाजांना माघारी धाडलं. लखनऊला २१ धावांनी विजय मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली.

will break shoaib akhtar record social media reactions on mayank yadav bowling
IPL 2024, GT vs SRH: अहमदाबादमध्ये गुजरात- हैदाराबाद आमने- सामने! कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११?
will break shoaib akhtar record social media reactions on mayank yadav bowling
CSK vs DC, IPL 2024: गुरु की शिष्य; कोण मारणार बाजी? कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

शोएब अख्तरसोबत तुलना...

क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड हा रावलपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरसोबत केली जात आहे. २००३ वर्ल्डकप स्पर्धेत शोएब अख्तरने ताशी १६१.३ गतीने चेंडू फेकला होता. आता आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात १५५.८ च्या गतीने चेंडू फेकणाऱ्या मयांकबद्दल देखील भाकीतं केली जात आहेत. अनेकांनी असा दावा केला आहे की, येणाऱ्या काळात तो शोएब अख्तरचा सर्वात जलद चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड मोडू शकतो.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करत असलेल्या लखनऊ सुपरजायंट्स संघाने २० षटकअखेर १९९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलागा करताना पंजाब किंग्ज संघाकडून जॉनी बेअरस्टोने आक्रमक सुरुवात करुन दिली होती. सुरुवातीच्या १० षटकात पंजाबने बिनबाद १०० धावा केल्या होत्या. असं वाटलं होतं की, पंजाबचा संघ या सामन्यात एकतर्फी विजय मिळवणार. मात्र मयांक यादवने गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com