IPL 2024 CSK vs GT Match Prediction: चेन्नई अन् गुजरात भिडणार! चेपॉकवर कोणता संघ बाजी मारणार?

IPL 2024 Chennai Super Kings vs Gujarat Titans Match Winner Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेतील सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत
IPL 2024 CSK vs GT captains
IPL 2024 CSK vs GT captainstwitter

CSK vs GT, IPL 2024 Match Analysis:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांनी गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल २०२३ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यात चेन्नईने बाजी मारत जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता पुन्हा या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात कोणता संघ बाजी मारु शकतो? जाणून घ्या.

असे आहेत दोन्ही संघांचे कर्णधार..

गेल्यावर्षी हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने आले होते, त्यावेळी दोन्ही संघांचे कर्णधार वेगेळे होते. एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार होता. तर गुजरातची धुरा हार्दिकच्या हाती होती. या हंगामात ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे. तर शुभमन गिल गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार आहे.

IPL 2024 CSK vs GT captains
IND vs AUS Test Series: IPL सुरु असताना भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर! या मैदानांवर रंगणार सामने

कोणाचं पारडं जड?

या दोन्ही संघांनी आयपीएल २०२४ स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. चेन्नईने पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा धुव्वा उडवला. तर गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केलं आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचं पारडं अधिक जड असणार आहे.

कारण आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये होम ग्राऊंडवर खेळणाऱ्या संघांनी सामने जिंकले आहेत. हा सामना चेन्नईच्या मैदानावर रंगणार आहे. तसेच चेन्नईच्या मैदानावर खेळताना चेन्नई सुपर किंग्ज संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. (Cricket news in marathi)

IPL 2024 CSK vs GT captains
Virat Kohli Viral Video: किंग कोहलीची सुरक्षा 'राम भरोसे', IPL सामन्यादरम्यान क्रिकेट फॅनची मैदानात घुसखोरी - Video

या सामन्यासाठी अशी असू शकते चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेइंग ११:

शुभमन गिल (कर्णधार), रिद्धीमान साहा, साई सुदर्शन, अजमतुल्लाह उमरजई, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान , आर साई किशोर, उमेश यादव, स्पेंसर जॉन्स

इम्पॅक्ट प्लेअर- साई सुदर्शन

अशी असेल चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेइंग ११:

रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अंजिक्य रहाणे,डॅरिल मिशेल, समीर रिजवी, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिपक चाहर, तुषार देशपांडे, महेश थीक्षणा, मुस्तफिजुर रहमान

इम्पॅक्ट प्लेअर - शिवम दुबे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com