SRH vs KKR Match: हॅरी ब्रुकचं दमदार शतक, हैदराबादकडून कोलकाताची धुलाई; विजयासाठी दिलं २२९ धावांचं आव्हान

SRH vs KKR Match : सनराईज हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट राईडर्ससमोर विजयासाठी २२९ धावांचं बलाढ्य आव्हान ठेवलं आहे.
SRH vs KKR IPL 2023 Match Updates
SRH vs KKR IPL 2023 Match UpdatesIPL, Twitter
Published On

SRH vs KKR Match Updates : सलामीवीर हॅरी ब्रुकचं दमदार शतक, त्याला कर्णधार एडम मार्करमने दिलेली ५० धावांची साथ आणि अखेरच्या काही षटकांत अभिषेक शर्मा आणि क्लासेनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरादावर सनराईज हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट राईडर्ससमोर विजयासाठी २२९ धावांचं बलाढ्य आव्हान ठेवलं आहे.

यंदाच्या हंगामातील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. त्याचबरोबर हॅरी ब्रूकने यंदाच्या हंगामातील पहिलंच शतक झळकावलं आहे. त्याने ५५ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याला हैदराबादच्या मधल्या फळीच्या फलंदाजांनी चांगलीच साथ दिली. (Latest sports updates)

SRH vs KKR IPL 2023 Match Updates
Kagiso Rabada IPL Record: रबाडाने मोडला IPL मधील सर्वात मोठा रेकॉर्ड; मुंबई इंडियन्सच्या मलिंगालाही टाकलं मागे

ईडन गार्डनवर सुरू असलेल्या या सामन्यात केकेआरचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावरप्लेमध्ये त्याचा हा निर्णय काही प्रमाणात गोलंदाजांनी सार्थ ठरवला. आंद्रे रसेलने मयांक अग्रवाल आणि राहुल त्रिपाठीला झटपट माघारी पाठवलं. मात्र, त्यानंतर हॅरी ब्रुकने एडम मार्करमच्या साथीने कोलकाताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. (Latest Marathi News)

हॅरी ब्रूकने मार्करमसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ७२ धावांची भागिदारी केली. मार्करम २४ चेंडूत ५० धावा काढून बाद झाला. त्याने २ चौकार आणि ५ सणसणीत षटकार ठोकले. त्यानंतर अभिषेक शर्माने ब्रुकला चांगली साथ दिली.

दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३३ चेंडूत ७२ धावांची भागिदारी केली.  (IPL 2023) अभिषेक शर्माने १७ चेंडूत ३२ धावा कुटल्या. त्याने काढलेल्या झटपट धावांमुळे हैदराबादला २०० धावांचा पल्ला ओलांडला आला. अखेरच्या षटकात ब्रुकने सणसणीत चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले.

कोलकाताकडून अष्टपैलू आंद्रे रसेलने भेदक मारा केला. त्याने हैदराबादच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. रसेल याने २.१ षटकात २२ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट घेतल्या. पण तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आंद्रे रसेल दुखापतग्रस्त झाला. रसेल याच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे रसेल याला मैदान सोडावे लागले. आंद्रे रसेल याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला अचूक टप्प्यावर मारा करता आला नाही.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com