IPL 2023 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठा उलटफेर; शुभमन गिलची टॉप ५ मध्ये धडाक्यात एन्ट्री

IPL 2023 Orange Cap table : गुजरात टायटन्सचा सलामीवर फलंदाज शुभमन गिलने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत धडाक्यात एन्ट्री घेतली आहे.
 ipl 2023 orange cap and purple cap list
ipl 2023 orange cap and purple cap listSaam TV
Published On

IPL 2023 Orange Cap table after PBKS vs GT 18th match : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा १६ वा हंगाम सुरू होऊन जवळपास दोन आठवड्यांचा कालावधी उलटत आला आहे. यादरम्यान, क्रिकेटप्रेमींना काही रंगतदार सामने देखील पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये टॉप ४ मध्ये फिनिश करण्यासाठी सर्वच संघांमध्ये चढाओढ दिसून येत आहे.

दुसरीकडे ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत सुद्धा अनेक खेळाडूंमध्ये स्पर्धा सुरू आहे. दरम्यान, पहिल्या आठवड्यात चेन्नई सुपरकिंग्जचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडी घेतली होती. मात्र, आता दुसऱ्या आठवड्यात पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. (Latest sports updates)

 ipl 2023 orange cap and purple cap list
Kagiso Rabada IPL Record: रबाडाने मोडला IPL मधील सर्वात मोठा रेकॉर्ड; मुंबई इंडियन्सच्या मलिंगालाही टाकलं मागे

तर दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपला तळ ठोकला आहे. तिसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा विस्फोटक फलंदाज जोश बटलरचा समावेश आहे. त्यामुळे मागच्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर असलेला ऋतुराज गायकवाड हा चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे.

याशिवाय गुजरात टायटन्सचा सलामीवर फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) सुद्धा टॉप ५ मध्ये एन्ट्री घेतली आहे. शुभमने गुरुवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज खेळी केली होती. त्याने ४९ चेंडूत ६७ धावा कुटल्या होत्या. या खेळीचा फायदा त्याला ऑरेंज कॅपच्या शर्यतीत झाला आहे.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप ५ फलंदाज

शिखर धवन (पंजाब किंग्ज) ४ सामने, २२३ धावा

डेव्हिड वॉर्नर, (दिल्ली कॅपिटल्स) ४ सामने, २०९ धावा

जोस बटलर (राजस्थान रॉयल्स) ४ सामने, २०४ धावा

ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपरकिंग्ज) ४ सामने, १९७ धावा

शुभमन गिल, (गुजरात टायटन्स) ४ सामने, १८३ धावा

 ipl 2023 orange cap and purple cap list
KKR Vs SRH Playing 11: कोलकाताचा रसगुल्ला की हैदराबादची बिर्याणी? कुणाची चव बिघडणार? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

ऑरेंज कॅप कुणाला दिली जाते?

ऑरेंज कॅप (Orange Cap) हा आयपीएलमध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे. संपूर्ण हंगामात जो फलंदाज सर्वाधिक धावा करेल, त्याला हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची रक्कम १५ लाख रुपये इतकी आहे. २००८ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळलेल्या शॉन मार्शने हा पुरस्कार पहिल्यांदा जिंकला होता.

आयपीएल २०२२ मधील ऑरेंज कॅप विजेता कोण?

गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने ऑरेंज कॅप जिंकली होती. बटलरने १७ सामन्यात १४९.०५ च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक ८६३ धावा केल्या होत्या. बटलरने ४ शतके आणि ४ अर्धशतके केली होती. यावेळीही (IPL 2023) बटलरने चांगली कामगिरी केल्यास तो ऑरेंज कॅपचा मानकरी होऊ शकतो. मात्र, यावेळी कोण बाजी मारतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com