Virender Sehwag On Prithvi Shaw : त्या शुबमन गिलकडे बघ!; पृथ्वी शॉवर विरेंद्र सेहवाग प्रचंड भडकला

IPL 2023, Virender Sehwag : पृथ्वी शॉ यानं खराब फटका खेळून आपली विकेट बहाल केली. त्यानंतर भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग प्रचंड भडकला.
Virender Sehwag On Prithvi Shaw
Virender Sehwag On Prithvi Shaw SAAM TV
Published On

IPL 2023, Virender Sehwag : दिल्लीतील अरूण जेटली मैदानावर मंगळवारी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत झाली. यात गुजरातने दिल्लीला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केलं. दिल्लीच्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब झाली. त्यात पृथ्वी शॉ देखील होता. त्यानं खराब फटका खेळून आपली विकेट बहाल केली. त्यानंतर भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग प्रचंड भडकला. (Latest sports updates)

गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) खेळताना दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉ खराब फटका खेळून बाद झाला. त्यानंतर विरेंद्र सेहवागने पृथ्वी शॉला चांगलेच फटकारले. त्याचवेळी पृथ्वी शॉने शुबमन गिलकडून काहीतरी शिकावं, असंही तो म्हणाला.

क्रिकबझशी बोलताना विरेंद्र सेहवागने पृथ्वी शॉला सुनावले. गुजरातविरुद्ध ज्या प्रकारे पृथ्वी शॉ बाद झाला. तशा प्रकारे त्याने अनेकदा आपली विकेट गमावली आहे. तरीही तो केलेल्या चुकांमधून काही शिकत नाही. त्याची पर्वा करत नाही. मोहम्मद शमीने अगदी साधारण चेंडू फेकला होता. ऑफ साइडला हा चेंडू टाकला होता आणि शॉने पूल फटका चुकवला आणि तो चेंडू थेट मिड ऑनला असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला, असे सेहवाग म्हणाला.

Virender Sehwag On Prithvi Shaw
DC Vs GT, IPL 2023 Highlights: काटा किर्रर्र… गोलंदाजी करत नॉर्खियाने उडवली गिलची दांडी, क्लीन बोल्डचा Video होतोय व्हायरल..

विरेंद्र सेहवाग म्हणाला की, ज्या अंडर १९ संघात पृथ्वी शॉ खेळत होता, त्याच संघात त्याच्यासोबत शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड देखील होता. त्यातील गिल हा खूप पुढे निघून गेला आहे. तर ऋतुराज गायकवाड हा आयपीएल २०२१ मध्ये ६०० हून अधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

पृथ्वी शॉ अनेकदा असे फटके खेळून बाद झाला आहे. त्याने आपल्या चुकांमधून काहीतरी शिकायला हवं. शुबमन गिलला बघ. त्याच्यासोबत गिलदेखील खेळला होता. पण सध्या तो भारताच्या संघासाठी कसोटी, वनडे आणि टी २० खेळत आहे, अशी आठवणही सेहवागने करून दिली.

Virender Sehwag On Prithvi Shaw
DC vs GT Match Result : गुजरात टायटन्सला'सुदर्शन' पावला; दिल्लीविरुद्ध मिळवून दिला दणदणीत विजय

शॉ अजूनही आयपीएलमध्ये संघर्ष करत आहे. आयपीएलसारख्या व्यासपीठाचा त्याने उपयोग करून घ्यायला हवा. धावा काढल्या पाहिजेत. गिल आणि ऋतुराजनेही धावा केल्या आहेत. तसं सातत्य पृथ्वी शॉने राखायला हवे, असा सल्लाही सेहवागने यावेळी दिला.

दरम्यान, आयपीएल २०२३ मध्ये पृथ्वी शॉ सलग दुसऱ्यांदा फलंदाजीत अपयशी ठरला आहे. पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध तो ९ चेंडूत अवघ्या १२ धावा काढू शकला. तर गुजरात टायटन्सविरुद्धही पृथ्वी शॉ अवघ्या ७ धावा करून बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com