MS Dhoni VIDEO Viral : आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनी दीपक चहरवर भडकला; VIDEO व्हायरल

MS Dhoni VIDEO Viral : धोनी चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरला ओरडतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
MS Dhoni
MS DhoniSaam Tv

CSK Win IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जने अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. शेवटच्या षटकात चेन्नईच्या हातून सामना आणि आयपीएलचं जेतेपद निसटतं की काय अशी स्थिती होती. मात्र रविंद्र जाडेजाने शेवटच्या दोन चेंडूवर एक षटकार आणि एक चौकार लगावत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

विजयानंतर चेन्नईच्या संघातील सर्वच खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. धोनीने देखील आपल्या शांत आणि खास शैलीत हा आनंद साजरा केला. शेवटच्या षटकात टेन्शनमध्ये दिसणाऱ्या धोनीच्या चेहऱ्यावरील विजयानंतरचे हावभाव सर्वकाही सांगून गेले. धोनीने जाडेजाला या सेलिब्रेशनदरम्यान उचलून घेतलं. Latest sports updates)

MS Dhoni
MS Dhoni Retirment: निवृत्तीची घोषणा करण्याची ही सर्वोत्तम वेळ; विजयानंतर काय म्हणाला महेंद्रसिंग धोनी?

एकीकडे असं चित्र असताना दुसरीकडे धोनी चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरला ओरडतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोघांमधील हे मैदानातील संभाषण मस्करी असली धोनी काहीसा नाराज दिसत होता.

गुजरातविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात दीपक चहरने मोठी चूक केली होती. मुंबईविरुद्धच्या सामन्यात धमाकेदार शतक ठोकणाऱ्या शुभमन गिलची कॅच सोडली होती. त्यानंतर चेन्नईची धाकधूक काहीशी वाढली होती. यावरुन धोनी दीपक चहरवर नाराज असल्याचं बोललं जात आहे.

MS Dhoni
CSK vs GT Last Over: लास्ट ओव्हर अन् २ बॉल १० रन... सर जडेजाने केली कमाल; असा रंगला निर्णायक थरार!

धोनीचा दीपक चहरला ऑटोग्राफ देण्यास नकार

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे की धोनी दीपक चहरला ऑटोग्राफ देण्यास नकार देत आहे. धोनी दीपक चहरला कॅच सोडण्याबाबत सल्ला देताना दिसला. धोनीचं मन वळवण्याचा दीपक चहर सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसता. अखेर राजीव शुक्ला यांच्या मध्यस्थीनंतर धोनीने दीपक चहरला जर्सीवर ऑटोग्राफ दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com