
CSK VS GT: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. रवींद्र जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
यासह चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाचव्यांदा जेतेपद मिळवून मुंबईच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?
चेन्नई सुपर किंग्ज संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी १५ षटकात १७१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईला चांगली सुरुवात मिळाली होती. ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनव्हेने मिळून ७४ धावांची भागीदारी केली.
ऋतुराज गायकवाड २६ धावा करत माघारी परतला. तर डेवोन कॉनव्हेने ४७ धावांचे योगदान दिले. या दोघांनी मिळून चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली होती.
अंतिम षटकात चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवण्यासाठी १३ धावांची गरज होती. पहिला चेंडू निर्धाव राहिला होता. दुसऱ्या चेंडूवर शिवम दुबेने १ धाव घेत रवींद्र जडेजाला स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूचा सामना करत जडेजाने १ धाव घेतली.
आता ३ चेंडूंमध्ये चेन्नईला विजयासाठी ११ धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर शिवम दुबेने एक धाव घेतली. अंतिम २ चेंडूंवर चेन्नईला विजयासाठी १० धावांची गरज होती. जडेजाने पाचव्या चेंडूवर षटकार मारला आणि अंतिम चेंडूवर चौकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. (Latest sports updates)
अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग
चेन्नई सुपर किंग्ज:
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महिश थिक्षणा
गुजरात टायटन्स:
वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.