आयपीएलच्या 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात होणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) एक मोठी घोषणा केली. आयपीएल 2021 नंतर तो बंगळुरू संघाचे नेतृत्व करणार नाही. आजच्या सामन्यात, कोहली मैदानावर पाऊल ठेवताच तो त्याच्या नावावर एक मोठा विक्रम करेल. तो RCB साठी 200 सामने खेळणारा खेळाडू बनणार आहे. तसेच एका संघासाठी 200 सामने खेळणारा तो पहिला भारतीय असेल. कोहलीच्या आधी कोणत्याही भारतीय खेळाडूने हा पराक्रम केलेला नाही. त्याच्या आधी महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी आयपीएलमध्ये 200 सामने खेळले आहेत. पण ते वेगवेगळ्या आयपीएल संघांसाठी खेळले आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की जगातील कोणत्याही क्रिकेटपटूने कोणत्या एका संघासाठी 200 टी -20 सामने खेळलेले नाहीत. विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे. तो इतर कोणत्याही फ्रँचायझीसाठी एकही हंगाम खेळलेला नाही. महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना देखील हा विक्रम करू शकले असते. पण फिक्सिंगमुळे चेन्नई सुपर किंग्जवर आयपीएलमधून 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या कारणास्तव दोन्ही खेळाडूंनी दोन हंगामांसाठी वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व केले.
आजच्या सामन्यात कोहली आणखी एक विक्रम त्याच्या नावावर करू शकतो. विराटने 71 पेक्षा जास्त धावा केल्या तर त्याच्या टी 20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण होतील. असे करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू असेल. कोहलीच्या आधी हा पराक्रम ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड, शोएब मलिक आणि डेव्हिड वॉर्नर यांनी केला आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.