

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात फायनल
वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना नवी मुंबईत होणार
डीवाय पाटील स्टेडियममध्ये दुपारी ३ वाजता सामना होणार सुरू
महिला क्रिकेट विश्वाला उद्या, रविवारी नवा चॅम्पियन मिळणार आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात फायनलचा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी ३ वाजता सामना सुरू होणार आहे. तर नाणेफेकीसाठी दोन्ही संघांचे कर्णधार अर्धा तास आधी म्हणजेच अडीच वाजता मैदानात येतील.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ वर्ल्डकप फायनल जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये तिसऱ्यांदा भारतीय संघानं एन्ट्री केलीय. भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियनचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. भारतीय संघ याआधी २००५ आणि २०१७ मध्ये वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र, दोन्ही वेळा निराशा पदरी पडली होती.
दुसरीकडं दक्षिण आफ्रिका संघ पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. पहिल्यांदा वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्याच्या इराद्यानं ते देखील मैदानात उतरतील. भारत आणि दक्षिण आफ्रिका वनडे वर्ल्डकप फायनलसंबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल सामना कधी होणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिका ( INDW vs SAW) यांच्यातील वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.
Ind W vs SA W यांच्यातील वर्ल्डकपची फायनल मॅच कुठे खेळवण्यात येईल?
नवी मुंबईतील डीवाय पाटील मैदानात (DY Patil Stadium) हा सामना होणार आहे.
India Women vs South Africa Women Final सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्डकपचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. टॉससाठी दोन्ही संघांचे कर्णधार दुपारी अडीच वाजता मैदानात येतील.
भारत-दक्षिण आफ्रिका फायनल सामना टीव्हीवर कसं बघाल लाइव्ह?
Ind W vs SA W final 2025 तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनलवर विविध भाषांमध्ये बघू शकता.
भारत-दक्षिण आफ्रिका फायनल सामन्याची लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे बघाल?
IND W vs SA W ICC Women's Cricket World Cup Final सामन्याची लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टारवर असणार आहे.
IND W vs SA W फायनल सामना लाइव्ह फ्री कुठे बघाल?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम लढत तुम्हाला कोणतेही शुल्क न देता बघता येईल. त्यासाठी तुमच्याकडे डीडी फ्री डीशचा डीडी स्पोर्ट्स चॅनल असायला हवा.
भारतीय संघ पुढीलप्रमाणे :
हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, हरलीन देओल, जेमिमा, ऋचा घोष, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, स्नेह राणा, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, उमा छेत्री, शेफाली वर्मा.
दक्षिण आफ्रिका महिला संघ
लॉरा व्होल्वॉर्ड्ट, अयाबोंगा खाका, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, मॅरिजेन कप्प, तजमिन ब्रिट्स, सिनालो जाफ्ता, नॉनकुलुलेको म्लाबा, एनरी डर्कसेन, एनेके बॉश, मसाबाता क्लास, सुने लूस, कराबो मेसो, तुमी सेखूखुने, नोंदुमिसो शांगसे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.