Cricket Retirement : टीम इंडियाला मोठा झटका; IND VS ENG मालिकेदरम्यान स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

Veda Krishnamurthy retirement announcement 2025 : इंग्लंड आणि इंडियामध्ये सुरु असलेल्या मालिकेदकम्यान भारताला मोठा धक्का बसला. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली.
Veda Krishnamurthy
Veda Krishnamurthy retirement Saam tv
Published On
Summary

वेदा कृष्णमूर्तीने २५ जुलै २०२५ रोजी निवृत्तीची घोषणा केली.स्टार खेळाडू वेदा कृष्णमूर्ती हिने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

वेदाने टीम इंडियासाठी शेवटचा सामना २०२० साली खेळला होता.

वेदाने निवृत्तीची घोषणा सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करत केली.

IND VS ENG : भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघामधील मालिका संपत असताना टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. वेदा कृष्णमृती असे स्टार खेळाडूचे नाव आहे.

Veda Krishnamurthy
Husband Wife Clash : बायको बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये, अचानक नवऱ्याची एन्ट्री; पुढे काय घडलं? वाचा

वेदाने टीम इंडियासाठी शेवटचा सामना २०२० साली खेळला होता. मागील ५ वर्षांपासून वेदा संघातून बाहेर होती. गेल्या ५ वर्षांपासून संघाबाहेर असलेल्या वेदाने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वेदाने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली.

वेदाने पोस्टमध्ये म्हटलं की, 'माझी कहाणी कडूरमधून सुरु झाली. मी बॅट उचलली, तेव्हा मला माहीत नव्हतं की, माझा प्रवास कुठंपर्यंत जाईल. मला क्रिकेट खूप आवडायचं. मला ठाऊक नव्हतं की, मी गल्ली क्रिकेटमधून जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपर्यंत पोहोचेल. भारताची जर्सी घालणे, माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. मला क्रिकेटने करिअर नाही, तर एक ओळख दिली. लढायचं कसं, पडायचं कसं आणि पडल्यानंतर पुन्हा उभं कसं राहायचं, हे सर्व क्रिकेटमुळे शिकली'.

Veda Krishnamurthy
Maharashtra Politics : बटन दाबलं की दिल्ली हादरेल, भाजपमध्ये भूकंप येईल, मग दाबा बटन; गिरीश महाजन यांचं एकनाथ खडसेंना आव्हान

'आज मनापासून तुमचा निरोप घेत आहे. मी आई-वडील, भाऊ-बहीण, विशेष म्हणजे मला सदैव साथ देणाऱ्या माझ्या बहिणीला धन्यवाद बोलू इच्छित आहे. आम्ही २०१७ साली विश्वचषक सामना खेळलो, त्यामुळे भारताच्या महिला क्रिकेटचं रुप बदललं. मला त्याचा नेहमी गर्व राहील, असेही तिने म्हटलं.

Veda Krishnamurthy
Rahul Gandhi : माझ्याकडून मोठी चूक झाली; राहुल गांधी यांनी भर सभेत मान्य केलं, नेमकं काय म्हणाले? VIDEO
Q

वेदा कृष्णमूर्तीने निवृत्तीची घोषणा केव्हा केली?

A

वेदा कृष्णमूर्तीने २५ जुलै २०२५ रोजी निवृत्तीची घोषणा केली.

Q

वेदाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळला?

A

वेदाने टीम इंडियासाठी शेवटचा सामना २०२० साली खेळला.

Q

वेदाने निवृत्तीची घोषणा कशी केली?

A

वेदाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत क्रिकेटला अलविदा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com